Shahrukh Khan made short film viral at the beginning of his career | शाहरुख खानने करिअरच्या सुरुवातीला केलेली शॉर्ट फिल्म व्हायरल
शाहरुख खानने करिअरच्या सुरुवातीला केलेली शॉर्ट फिल्म व्हायरल
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आज हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. सर्वांनाच माहित आहे की शाहरुख खानने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील कलाकारापासून ते सुपरस्टार होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सर्वांनीच पाहिला आहे. शाहरुख खानने आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं होतं. ही शॉर्ट फिल्म सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. 1991 मध्ये ही शॉर्ट फिल्म शूट करण्यात आली होती. आज कोटींचं मानधन घेणा-या शाहरुख खानला या शॉर्ट फिल्मसाठी फक्त तीन हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं. 
 
'महान कर्ज' असं या शॉर्टफिल्मचं नाव आहे. शाहरुख खान यामध्ये एका श्रीमंत वडिलांच्या मुलाची भुमिका निभावत आहे. 17 मिनिटांची ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर एसआरके इन माय ब्लड नावाने आपलोड करण्यात आली आहे. ही शॉर्टफिल्म म्हणजे शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक गिफ्टच म्हणावं लागेल. तीन वर्षापूर्वी या शॉर्टफिल्मचा एक भाग अपलोड करण्यात आला होता, मात्र त्यावेळी त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावेळी फक्त एक हजार लोकांनी ही शॉर्ट फिल्म पाहिली होती. मात्र यावेळी फक्त एका दिवसात 30 हजाराहून जास्त लोकांनी शॉर्ट फिल्म पाहिली आहे.
 

Web Title: Shahrukh Khan made short film viral at the beginning of his career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.