Self-marketing is not possible: Dharmendra | स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र
स्वत:ची मार्केटिंग जमलीच नाही : धर्मेंद्र

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे सध्या एका पंजाबी चित्रपटानिमित्त व्यस्त आहेत. पंजाबी असूनही आतापर्यंत एकाही पंजाबी चित्रपटात त्यांना काम करता आले नाही. या गोष्टीची त्यांना खंत वाटते. ८०-९० च्या दशकात पंजाबी चित्रपट करण्याची इच्छा होती; परंतु त्यावेळी वेळच नव्हता. रात्री उशिरापर्यंत शूटिंगनिमित्त बाहेरच राहावे लागे. त्यावेळी पंजाबी चित्रपट स्वीकारला असता, तर संबंधित निर्मात्यास वेळच देता आला नसता. माझ्या स्वभावास ते पटणारे नव्हते, असे धर्मेंद्र यांनी सांगितले. चांगले काम करूनही अनेकदा मला टीका सहन करावी लागली. स्वत:ची मार्केटिंग करणे मला जमलेच नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


Web Title: Self-marketing is not possible: Dharmendra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.