Salman Khan in love of Marathi! | सलमान खान मराठीच्या प्रेमात!
सलमान खान मराठीच्या प्रेमात!
मुंबई : मराठी चित्नपटांचे वाढत जाणारे वलय हिंदी चित्नपटसृष्टीलाही खुणावू लागले आहे. हिंदीतील बरेच जण मराठीत एंट्री घेऊ लागले असताना, अभिनेता सलमान खानही यापासून मागे  नाही. ‘लय भारी’तून त्याची झलक दिसलीच. मात्र आता तो मराठीच्या प्रेमात पडल्याचे चित्न आहे.  ‘सांगतो ऐका’ या मराठी चित्नपटाच्या व्यासपीठावर अवतरलेल्या सलमानने त्याची चुणूक दाखवली. 
आम्ही एक मराठी चित्नपट केला होता आणि तो म्हणजे लय भारी ! त्यानंतर मराठीकडे आमचे लक्ष वळले होते.  ‘सांगतो ऐका’  या मराठी चित्नपटाचा विषय मला खूप आवडला होता. आम्ही  हा चित्नपट टेकओव्हर करण्याचा खूप प्रयत्न केला. पण आमच्या हाती काही हा चित्नपट आला नाही, मात्न मला आशा आहे की हा चित्नपट  ‘लय भारी’पेक्षाही मोठी मजल गाठेल, असे सलमान खानने सांगितले. ‘सांगतो ऐका’ या मराठी चित्नपटाच्या पाठीशी असल्याचेही सलमानने या वेळी स्पष्ट केले. 
सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्नपटात अभिनेता सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्नपटाच्या निमित्ताने मराठी चित्नपटसृष्टीत दमदार कामगिरी करणारा सतीश राजवाडे आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर प्रथमच एकत्न आले आहेत.  (प्रतिनिधी) 

 


Web Title: Salman Khan in love of Marathi!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.