Madhubari Dixit in the sequel of Bahubali | बाहुबलीच्या सिक्वेलमध्ये माधुरी दीक्षित

बाहुबलीच्या सिक्वेलमध्ये माधुरी दीक्षित

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० -  बॉक्स ऑफिसवर धुमधडाका उडवून देणा-या बाहुबली चित्रपटाचा लवकरच सिक्वेल येणार आहे. या सिक्वेलमध्ये बॉलिवूडमध्ये धकधक गर्ल म्हणून प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. 
बाहुबलीच्या सिक्वेलचे येत्या महिन्यात चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे. या चित्रपटात राजघराण्याची राणी कुंतला हिच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित हिची निवड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  याबाबत माधुरीला विचारले असता तीनेही आपल्याला या चित्रपटात काम करण्यास आवडेल असे म्हटल्याचे सुत्रांकडून समजते. 
तर दुसरीकडे अशीही चर्चा होत आहे की, या चित्रपटात राणी कुंतलाच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित हिच्या ऐवजी अभिनेत्री विद्या बालन हिची सुद्घा निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   
गेल्या जुलै महिन्यात देशभर  बाहुबली चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सुपरस्टार प्रभास, राणा दगुबती,  अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटीया, रम्या कृष्णन, सत्यराज, नासिर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 
 

Web Title: Madhubari Dixit in the sequel of Bahubali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.