Legal notices by Hrithik Roshan on 'Pope' objectionable tweet | 'पोप'बद्दलच्या आक्षेपार्ह ट्विटवरून हृतिक रोशनला लीगल नोटीस
'पोप'बद्दलच्या आक्षेपार्ह ट्विटवरून हृतिक रोशनला लीगल नोटीस
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - बॉलिवूडचा ग्रीक गॉड अभिनेता हृतिक रोशन याच्यापुढील अडचणी काही संपताना दिसत नाहीत. कंगना राणावत सोबत झालेल्या भांडणानंतर कंगनाने त्याला कायदेशीर नोटीस पाठवलेली असतानाच 'पोप' बद्दल केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे हृतिक आणखी अडचणीत सापडला आहे. याप्रकरणी त्याला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 
हृतिक आणि कंगनाच्या अफेअरबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती, त्यानंतर मध्यंतरी एका मुलाखतीत कंगनाने हृतिकचा उल्लेख सिली-एक्स असा केला होता आणि त्यांच्यातील वाद आणखीन उफाळला. यामुळे भडकलेल्या हृतिकने 'प्रसारमाध्यमे ज्या (सुंदर) अभिनेत्रींशी माझे नाव जोडत आहे त्यांना डेट करण्यापेक्षा मी 'पोप'सोबत अफेअर करण्याचे जास्त चान्सेस आहेत' असे ट्विट केले होते. याच ट्विटवरून आता तो अडचणीत सापडला आहे. 
याप्रकरणी ऑल इंडिया प्रेसिडेंट ऑफ दि इंडियन ख्रिश्चन व्हॉईस या संस्थेच्या अब्राहम मथाई यांनी हृतिकला 'पोपबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्या' प्रकरणी कायदेशीर नोटीस बजावली आहे. 
Web Title: Legal notices by Hrithik Roshan on 'Pope' objectionable tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.