Karan Johar gave Rs 25 lakh for defame of 'Apart' - Ajay Devgn | 'शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण

'शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - सेलिब्रिटी वॉर आणि ट्विटरवरील भांडणे हे काही बॉलिवूडसाठी नवीन नाही. दोन महत्वाकांक्षी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असतील तर ब-याच वेळा मोठ्या पडद्यावर युद्ध छेडले जाते. असाच प्रकार याही वेळेस घडला असून, तो थोडा गंभीर असल्याचे दिसत आहे. कारण यावेळी हे भांडण सुरू आहे अभिनेता अजय देवगण वि. दिग्दर्शक करण जोहर- कमाल खान यांच्या दरम्यान...
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित 'शिवाय' हा चित्रपट दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित होणार असून त्याचवेळेस करण जोहर दिग्दर्शित ' ए दिल है मुश्किल' हाही मोठ्या पडद्यावर येणार आहे. विक्षिप्त स्वभावाचा अभिनेता कमाल आर खान हा त्याच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून 'शिवाय' चित्रपटाची निंदा करताना दिसत असून या आठवड्यातच ट्रेलर रिलीज करण्यात आलेल्या ' ए दिल है मुश्किल'चे मात्र गुणगान करताना दिसत आहे. यावरूनच अजय देवगण भडकला असून 'शिवाय'ची निंदा करण्यासाठी दिग्दर्शक करण जोहरनेच के.आर.केला २५ लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप अजयने केला आहे. एवढेच नव्हे तर अजयचा जवळचा मित्र असणारे व निर्मात कुमार मंगत यांचे के.आर.के.शी फोनवरून झालेले संभाषण रेकॉर्ड करून त्याने ती क्लीप ट्विटरवरही शेअर केली आहे. त्या रेकॉर्डिंगमध्ये कुमार मंगत यांनी के.आर.के. ला 'शिवाय'ची बदनामी का करत आहेस? तसेच करण जोहरच्या चित्रपटाचे इतके कौतुक कशासीठी असे विचारले असता,  ज्याने आपल्याला २५ लाख दिले, त्याच्याबाजूने काही तरी बोलावे लागेलच ना, असे उत्तर के.आर.के. ने दिले. 
कमाल खानने मात्र हे वृत्त फेटाळले असून कुमार मंगत यांनीच आपल्याला पैसे देऊ केल्याचे म्हटले आहे. तसेच ' एकीकडे अजय माजी स्वयंघोषित नंबर.१ समीक्षक अशी हेटाळणी करतो मग त्याला, मी त्याच्या चित्रपटाचे नुकसान करेन अशी भीती का वाटते?' असा सवालही के.आर.केने विचारला आहे.  दरम्यान करण जोहरने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी येत्या काळात हे युद्ध आणखीनच भडकण्याची शक्यता दिसते. 
याप्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही अजयने केली आहे.  
 

Web Title: Karan Johar gave Rs 25 lakh for defame of 'Apart' - Ajay Devgn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.