Hema Malini and Dharmendra to be again grandparents! | हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा होणार आजी-आजोबा!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा होणार आजी-आजोबा!

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - बॉलिवूडची नावाजलेली अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र पुन्हा एकदा आजी-आजोबा होणार असल्याची गोड न्यूज समजली आहे. देओल कुटुंबीयांच्या घरात लवकरच पाळणा हलणार असल्याची बातमी गोपाल कमल मुखर्जी यांनी दिली आहे.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री इशा देओल गर्भवती असल्याची आनंदवार्ता उघड झाली आहे. इशा देओल आणि उद्योजक पती भरत तख्तानी यांनी 2012ला विवाह केला होता. त्यानंतर इशा देओल बॉलिवूडपासून काहीशी दूर गेली होती. मात्र इशा आणि भरत लवकरच आई-बाबा होणार असल्याचं आता खात्रीलायक वृत्त समजलं आहे. मात्र याची वाच्यता हेमा मालिनी किंवा इशाच्या कुटुंबीयांनी कुठेही केलेली नाही. ही बातमी दुसरे, तिसरे कोणी नव्हे, तर हेमा मालिनी यांच्या आयुष्यावर पुस्तक लिहिणारे लेखक गोपाल कमल मुखर्जी यांनी दिली आहे.

गोपाल कमल मुखर्जी "बियॉन्ड द हेमा मालिनी" हे पुस्तक लिहित आहेत. लेखक गोपाल कमल मुखर्जी हे देओल कुटुंबीयांचे जवळचे समजले जातात. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे धाकटी मुलगी आहानाच्या मुलाचे आजी-आजोबा बनल्यानंतर आता इशा देओलही आई बनणार आहे. इशाने बॉलिवूडमध्ये कोई मेरे दिल से पुछे, धूम, युवा, एलओसी कारगिल आणि दस यांसारख्या हिंदी चित्रपटांत काम केलं आहे.

2003मध्ये इशा देओलला कोई मेरे दिल से पुछे या चित्रपटासाठी बेस्ट फीमेल डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. इशा देओल सध्या आई हेमा मालिनीसह जुहूतील बंगल्यात राहत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जुहूतील घरात हेमा मालिनी इशाच्या येणाऱ्या बाळासाठी एक सुंदर खोलीही बनवत आहेत. इशा देओलनं किल देम यंग हा शेवटचा चित्रपट केला होता.


Web Title: Hema Malini and Dharmendra to be again grandparents!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.