इलेक्ट्रॉनिक मीडिया दरदिवशी हिरो किंवा व्हिलन तयार करते - शाहरुख खान

By Admin | Published: April 4, 2016 01:24 PM2016-04-04T13:24:54+5:302016-04-04T13:33:57+5:30

इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रत्येक दिवशी हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं याचा प्रयत्न करतात असं शाहरुख खान बोलला आहे

Electronic media produces heroes or villains on every day - Shah Rukh Khan | इलेक्ट्रॉनिक मीडिया दरदिवशी हिरो किंवा व्हिलन तयार करते - शाहरुख खान

इलेक्ट्रॉनिक मीडिया दरदिवशी हिरो किंवा व्हिलन तयार करते - शाहरुख खान

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ४ - बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने इलेक्ट्रॉनिक मीडियावरील आपली नाराजी व्यक्त केली आहे.  इलेक्ट्रॉनिक मीडिया दररोज हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं याचा ते प्रयत्न करतात अशा शब्दांत शाहरूखने टीका केली आहे.  मिड-डे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने हे वक्तव्य केलं आहे. 
 
तुम्हा फॉलो करण्यासाठी कुणी आदर्श असण्याची गरज काय ? असा सवालही शाहरुखने यानिमित्ताने विचारला आहे. मीडिया कोण वाईट आणि कोण चांगलं याबद्दल स्वत:च गाजावाजा करत असतं. कोणी आपला हिरो किंवा आदर्श असावं हे फक्त दोन गोष्टींवर अवलंबून असतं. जो कोणी तुमच्यासारखा असेल किंवा ज्याच्यासारखं तुम्हाला बनायचं आहे. तुम्ही आजूबाजूला पाहिलंत तर हिरोंची कमतरता नाही आहे. माझ्यासाठी 24 तास काम करणारा माझा ड्रायव्हरी हिरो आहे. स्पेशल असणं स्पेशल नसतं असं सांगत शाहरुखने मीडियावर टीकास्त्र सोडलं.
 
शाहरुखने मुलाखतीदरम्यान मीडिया कव्हरेजवरही नाराजी व्यक्त केली. कोलकाता फ्लायओव्हर दुर्घटनेवर बोलताना शाहरुखनने इलेक्ट्रॉनिक मीडिया 40 मिनिटंदेखील दुखाची भावना जगू देत नाही असं म्हंटलं आहे. 
 
कोलकातामध्ये झालेल्या अपघातानंतर प्रत्येकाची पहिली भावना दुख: असेल, आणि मृत्युमुखी पडलेले आपल्यासारखेच असतील असा विचारदेखील मनात येईल. मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया 40 मिनिटंदेखील दुखाची भावना जगू देत नाही. कारण त्यानंतर ते त्या घटनेच्या राजकारणाकडे वळतात आणि त्यावर चर्चा करु लागतात. यादरम्यान आपणही दुख: विसरुन घटनेला कोण जबाबदार यावर चर्चा करु लागतो असं शाहरुखने म्हंटलं आहे. हिरो, व्हिलन आणि सनसनाटी बातम्यांच्या मागे लागून आपण आपल्या भावना विसरलो आहोत असंही शाहरुख खान म्हणाला.
 

Web Title: Electronic media produces heroes or villains on every day - Shah Rukh Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.