Do not think Shahrukh will work with me - Sonam Kapoor | शाहरुख माझ्यासोबत काम करेल असं वाटत नाही - सोनम कपूर
शाहरुख माझ्यासोबत काम करेल असं वाटत नाही - सोनम कपूर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ -  बॉलिवूडची फॅशन आयकॉन , अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच उलट-सुलट विधानांमुळे चर्चेत असते. एखाद्या अभिनेत्रीच्या ड्रेसिंग वा मेक-अप सेन्सबद्दल केलेली टीका असो वा एखाद्या वादग्रस्त मुद्यावर मत मांडणए असो, सोनम नेहमीच बिनधास्त अंदाजात वावरते. मात्र यावेळी तर तिने खुद्द बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानबद्दलच तक्रार केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 
'किंग ऑफ रोमान्स' अशी ओळख असलेल्या शाहरूखसोबत आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे ही प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते, सोनमही इतर अभिनेत्रींपेक्षा वेगली नाही. चित्रपटसृष्टीत येऊन बराच काळ झाला तरी आत्तापर्यंत शाहरूखसोबत काम करण्याचा योग तिच्या आयुष्यात आलेला नाही. तिलाही बॉलिवूडच्या बादशहासोबत काम करण्याची इच्छा असली तरी शाहरुखला अद्याप तसं वाटत नाही, अशी तक्रार तिने केली आहे.

 

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिने या विषयासंदर्भात भाष्य केले आहे. ' शाहरुखसोबत काम करायला मला कधीही आवडेल, मी तसे अनेक प्रयत्नही केले. पण अद्याप तरी मला अशी संधी मिळालेली नाहीये. कदाचित ज्या दिवशी त्याला ( शाहरूख) माझ्यासोबत काम करावेस वाटेल, तेव्हाच हे शक्य होईल,' असं सोनम म्हणाली. 
 
एवढंच नव्हे तर ' चित्रपटसृष्टीमध्ये कोणत्या अभिनेत्रीसोबत काम करायचे हे तर अभिनेताच ठरवतो. त्याला आवडणा-या अभिनेत्रीलाच चित्रपटात संधी मिळते. शाहरुखच्या बाबतीतही कदाचित तसंच असेल. मला त्याच्यासोबत काम करायची इच्छा असली तरीही कदाचित त्याला तसं वाटत नसेल' असा टोलाही सोनमने शाहरूखच्या आडून (सर्वांना) हाणला. 

Web Title: Do not think Shahrukh will work with me - Sonam Kapoor
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.