माझे बाबा प्रत्यक्षातही एक अत्यंत धम्माल व्यक्ती आहे. ते पडद्यावर जितकी झमाल करतात, त्यापेक्षाही जास्त गंमती जमती ते रिअल लाइफमध्ये करतात असं कौतुक श्रद्धा कपूरनं केलं आहे. बागी किंवा बंडखोर हा टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूरचा सिनेमा उद्या प्रदर्शित होत असून त्यानिमित्तानं मीडियाशी या जोडीनं संवाद साधला आणि करीअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येत असलेल्या या सिनेमाला लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.
 
 
टायगर श्रॉफ या सिनेमात अत्यंत वेगळ्या अवतारात दिसणार असून निर्माता साजिद नाडियादवालाने याबाबतचा सस्पेन्स टिकवल्याची चर्चा आहे.
 
 
या आधी कधीही बॉलीवूडमध्ये दिसले नाहीत असे स्टंट्सही या सिनेमात असल्याचं सांगण्यात येत आहे. आशिकी - 2ची हिरॉइन श्रद्धा कपूर व हीरोपंतीचा हीरो टायगर श्रॉफ या चित्रपटामुळे प्रथमच एकत्र काम करत आहेत.

 

Web Title: Dada Shakti Kapoor's real life also has flowers - Shraddha Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.