Anushka Prabhas seems to be more 'sexy'? | अनुष्काला प्रभास वाटतो जास्त ‘सेक्सी’?
अनुष्काला प्रभास वाटतो जास्त ‘सेक्सी’?

‘बाहुबली-२’ या चित्रपटात देवसेना अन् बाहुबली यांची लव्हस्टोरी अन् पुढे वैवाहिक जीवन अतिशय सुंदर पद्धतीने दाखविण्यात आले आहे. आता या दोघांनी म्हणजेच अनुष्का शेट्टी-प्रभासने रिअल लाइफमध्येही एकमेकांशी विवाह करावा, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. कारण या दोघांची जोडी खूपच छान दिसत असल्याने त्यांनी आयुष्यभर एकत्र राहावे, असाच काहीसा सूर व्यक्त केला जात आहे. पण, ही नुसतीच चाहत्यांचीच अपेक्षा नाही, तर अनुष्काच्या मनातही असेच काहीसे चित्र आहे. जेव्हा तिला प्रभासविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर थक्क करणारे होते. एका मुलाखतीदरम्यान जेव्हा अनुष्काला ‘प्रभास आणि राणा डग्गुबत्ती यांच्यापैकी सर्वाधिक सेक्सी कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता ‘प्रभास’ सर्वाधिक सेक्सी असल्याचे म्हटले. तर राणाविषयी तिने दिलेले उत्तर अनेकांच्या भुवया उंचविणारे ठरले. तिने राणाला ‘ब्रो’ असे म्हटले. अनुष्का म्हणाली, की ‘राणा तिला ब्रदर असे म्हणतो अन् मीदेखील राणाला ब्रदर म्हणूनच बोलावते. आता अनुष्काचे हे उत्तर ऐकून तिच्या मनात प्रभासविषयी नक्कीच फीलिंग असेल, यात शंका नाही. परंतु जर प्रभासचा विचार केला तर त्याने आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक मुलींचे संबंध नाकारले आहेत. अशात त्याच्या मनात अनुष्काप्रती कितपत
प्रेम असेल, हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागेल.

Web Title: Anushka Prabhas seems to be more 'sexy'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.