Amrita wanted to introduce my mother and sister to Shiva - Saif Ali Khan | अमृता माझ्या आई आणि बहिणीला शिव्या घालायची - सैफ अली खान

अमृता माझ्या आई आणि बहिणीला शिव्या घालायची - सैफ अली खान

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी आपल्या घटस्फोटावर नेहमीच मौन बाळगलं आहे. 10 वर्षांपुर्वी दोघांचा घटस्फोट झाला. मात्र त्यानंतर कधीच दोघांनीही एकमेकांविरोधात भाष्य केलं नाही. पण सध्या सैफ अली खानने 2005 रोजी टेलिग्राफला दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या मुलाखतीत सैफ अली खानने आपल्या खासगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 
 
या मुलाखतीत अमृता सिंगबद्दल बोलताना सैफने सांगितलं आहे की, "जेव्हा तुम्हाला वारंवार काहीच कामाचे नसल्याची जाणीव करुन दिली जाते, तेव्हा खूप वाईट वाटतं. दरवेळी तुमच्या आई आणि बहिणीला शिव्या दिल्या जातात. माझ्या आयुष्यातील खूप मोठा भाग या परिस्थितीतून गेला आहे". याशिवाय सैफ अली खानने घटस्फोटानंतर अमृता सिंगला दिलेल्या रकमेवरही चर्चा केली आहे. 
 
"मला घटस्फोटानंतर अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे होते, ज्यामधील अडीच कोटी मी आधीच दिले आहेत. याशिवाय जोपर्यत माझा मुलगा 18 वर्षांचा होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत. मी कुणी शाहरुख खान नाही, आणि माझ्याकडे एवढे पैसेही नाहीत. सर्व रक्कम देण्याचं आश्वासन मी दिलं असून शेवटच्या श्वासापर्यंत देत राहिन", असं सैफ मुलाखतीत बोलला आहे.
 
सैफने आपल्या या मुलाखतीत हेदेखील सांगितलं आहे की, जाहिरात, स्टेज शो आणि चित्रपटांमधून कमावलेला सर्व पैसा आपल्या मुलांवर खर्च करण्यासाठी देत आहोत. "माझ्याकडे दमडीही शिल्लक नसून माझं घरही अमृताच्या नावे आहे", असं सैफने सांगितलं. 
 
यावेळी सैफने आपली त्यावेळची गर्लफ्रेंड रोजासंबंधी बातचीत केली. "रोजा चित्रपटसृष्टीतील नसून आम्ही दोन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहतो. रोजा अमेरिकेची असून चित्रपटसृष्टीबाहेरची आहे. तिच्यासोबत असताना आपण काहीतरी असल्याची जाणीव मला होते", असं सैफ मुलाखतीत बोलला होता.
 

Web Title: Amrita wanted to introduce my mother and sister to Shiva - Saif Ali Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.