Ajay Devgn's 'Apart' is not a Pakistani artist in the film | अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटात पाकिस्तानी कलाकार नाही

अजय देवगणच्या 'शिवाय' चित्रपटात पाकिस्तानी कलाकार नाही

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - 'शिवाय' या चित्रपटात कोणतीही पाकिस्तानी अभिनेत्री काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण अभिनेता आणि निर्माता अजय देवगण यांनी दिलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणच्या शिवाय या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र अजय देवगणने हे वृत्त फेटाळलं आहे.

उरी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच इम्पानं प्रस्ताव पारित करून पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात काम करण्यापासून रोखलं आहे. याआधी मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडण्याची धमकी दिली होती. 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस' या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान असल्यानं मनसेनं त्या चित्रपटांनाही विरोध केला होता.

याच पार्श्वभूमीवर अजय देवगणच्या शिवाय चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने काम केल्याची चर्चा होती. मात्र अजय देवगणच्या प्रवक्त्यानं हे वृत्त फेटाळून लावलं आहे. कोणतीही पाकिस्तानी अभिनेत्री शिवाय चित्रपटात काम करणार नसल्याचं अजय देवगणच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा

इम्पाची पाकिस्तानी कलाकारांना नो एंट्री, 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट अडचणीत

 

Web Title: Ajay Devgn's 'Apart' is not a Pakistani artist in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.