Actor Saif Ali Khan injured during filming | चित्रीकरणा दरम्यान अभिनेता सैफ अली खान जखमी
चित्रीकरणा दरम्यान अभिनेता सैफ अली खान जखमी

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - आगामी होमप्रोडक्शनच्या चित्रीकरणा दरम्यान अभिनेता सैफ अली खान जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी सकाळी पवई येथे चित्रीकरण करत असताना सैफच्या अंगठयाला गंभीर दुखापत झाली. 
 
त्याला तातडीने अंधेरीच्या कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच त्याच्या अंगठयावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता सैफची तब्येत चांगली असल्याची माहिती त्याची बहिण सोहा अली खानने दिली. सोमवारी किंवा मंगळवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. 
 
४५ वर्षीय सैफ नुकतेच 'रंगून'चे शूट संपवून अक्षत वर्माचे दिग्दर्शन असलेल्या होम प्रोडक्शनच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सैफ रुग्णालयातून डिस्चार्ज घेईल असे सोहा अली खानने सांगितले. याआधी विशाल भारव्दाजच्या रंगूनच्या चित्रीकरणा दरम्यान सैफच्या हाताला दुखापत झाली होती. एजंट विनोद चित्रपटातील अॅक्शन दुश्य चित्रीत करत असतानाही त्याला दुखापत झाली होती. 

Web Title: Actor Saif Ali Khan injured during filming
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.