Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या गोलंदाजाला बसवलं बाकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 21:01 IST2025-09-10T20:54:42+5:302025-09-10T21:01:55+5:30

whatsapp join usJoin us
India vs United Arab Emirates 2nd Match Biggest Surprise No Arshdeep Singh In The Playing 11 First Match Of Asia Cup 2025 | Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025, No Arshdeep Singh In Team India Playing 11 First Match Against UAE : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यूएई विरुद्धच्या लढतीसह टी-२० आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अर्शदीप सिंगला संधी मिळालेली नाही. अर्शदीप सिंग हा भारतीय टी-२० संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.  छोट्या फॉरमॅटमध्ये भारताकडून त्याने सर्वाधिक ९९ विकेट्स घेतल्या आहेत. शंभरीचा डाव साधून तो मोठा विक्रम आपल्या नावे करेल, अशी चर्चा रंगली असताना त्याला बाकावर बसवण्यात आले आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

शंभरीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अर्शदीप सिंगला बसवलं बाकावर

अर्शदीप सिंग याने आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत ६३ टी२० आंतरारष्ट्रीय सामन्यात ९९ विकेट्स घेतल्या आहेत. एका विकेटसह तो क्रिकेटच्या छोट्या प्रकारात शंभर विकेटचा डाव साधणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरणार आहे. पण पहिल्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आल्यामुळे मोठा डाव साधण्याची त्याची प्रतिक्षा लांबली आहे. 

Asia Cup Record : रोहित-अझरुद्दीन यांनी दुहेरी डाव साधला; पण MS धोनीच्या नावे आहे खास रेकॉर्ड

एक प्रमुख जलदगती गोलंदाज, तीन फिरकीपटूंसह ऑलराउंडवर भर

भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेतील पहिल्या टी-२० सामन्यासाठी जसप्रीत बुमराहच्या रुपात एका प्रमुख जलदगती गोलंदाजांसह तीन फिरकीपटूंना खेळवण्याला पहिली पसंती दिलीये. याशिवाय मध्यम जलदगती गोलंदाजाच्या  रुपात हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेला खेळवण्याचा निर्णय घेतलाय. परिणामी या प्लॅनमुळे टी-२० तील भारताच्या गोलंदाजीतील सिंग इज किंगवर बाकावर बसण्याची वेळ आली आहे. यूएई विरुद्धचा हा प्लॅन ठिकये, पण पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यावेळी मात्र हा डाव खेळताना टीम इंडियाला शंभर वेळा विचार करावा लागेल. १४ सप्टेंबरला तरी अर्शदीपला शंभरीचा डाव साधण्याची संधी मिळणार का? ते आता पाहण्याजोगे असेल.

भारताची प्लेइंग इलेव्हन 

अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उप-कर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर बॅटर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
 

Web Title: India vs United Arab Emirates 2nd Match Biggest Surprise No Arshdeep Singh In The Playing 11 First Match Of Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.