'दृश्यम' स्टाईल हत्येचा अखेर उलगडा; वसईतील गिरीज येथून आरोपीला पोलिसांनाकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:09 IST2025-02-27T17:08:51+5:302025-02-27T17:09:46+5:30

लग्नासाठी घरातून विरोध असल्या कारणामुळे केलेली प्रेयसीची हत्या

Drishyam movie style murder finally solved Accused arrested by police from Girij in Vasai | 'दृश्यम' स्टाईल हत्येचा अखेर उलगडा; वसईतील गिरीज येथून आरोपीला पोलिसांनाकडून अटक

'दृश्यम' स्टाईल हत्येचा अखेर उलगडा; वसईतील गिरीज येथून आरोपीला पोलिसांनाकडून अटक

मंगेश कराळे - लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: लग्नासाठी घरातून विरोध असल्या कारणामुळे प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह विल्हेवाट लावणाऱ्या वसईतील गिरीज येथून आरोपी प्रियकराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. उत्तर प्रदेशातील मिसींग महिलेचा दोन महिन्यापुर्वी 'दृश्यम' सिनेस्टाईलने केलेल्या खुनाचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड करुन आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.

अधिक माहितीनुसार, २७ डिसेंबर २०२४ रोजी महिला प्रिया सिंग (२५) ही कुडाघाट झरना टोला, गोरखपुर, उत्तरप्रदेश येथून बेपत्ता झाली होती. याबाबत उत्तरप्रदेशच्या गोरखपुर येथील एम्स पोलीस ठाणे येथे २९ डिसेंबर २०२४ रोजी मनुष्य मिसींग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील बेपत्ता महिलेचा शोध घेण्याचे अनुषंगाने उत्तर प्रदेश येथील पोलीस पथक हे २५ फेब्रुवारीला गुन्हे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना भेटले. त्यांनतर सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवुन मिसींग महिलेचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांना आदेश दिले होते.

मिसींग प्रकरणाचे तपासादरम्यान तांत्रीक विश्लेषन व मिळालेल्या माहितीच्या आधारे मिसींग महिला ही अधुन मधुन वसईच्या गिरीज येथे राहणाऱ्या अमित सिंगला भेटण्यासाठी उत्तरप्रदेश येथुन येत होती. १६ डिसेंबर २०२४ रोजी ती अमितला भेटण्यासाठी वसई येथे आली असल्याचे समजले. म्हणून अमितला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या कार्यालयात आणून त्याचेकडे चौकशी केली. तो सुरुवातीला उडवा उडवीचे उत्तरे देऊ लागला.

नंतर चौकशीदरम्यान समजले की, अमितचे मिसिंग महिला प्रिया सिंग सोबत प्रेमसंबध होते. परंतु त्यांचे घरातील सदस्य त्यांचे लग्नाला विरोध करीत असल्याने अमित तिला लग्नाला टाळाटाळ करीत होता. परंतु प्रिया ही वारंवार लग्नासाठी हट्ट करु लागल्याने अमितने २५ डिसेंबरला रात्रीच्या वेळी प्रियाला फिरण्याचे बहाण्याने पोमणच्या महाजन पाडा येथे असलेल्या रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील मोकळ्या परिसरात घेवुन गेला. तेथे रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रियाचा गळा दाबुन तिला जिवे ठार मारुन तिचे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे हेतुने बाजुला असलेल्या नाल्यामध्ये फेकुन दिले. तसेच प्रिया ही वसई येथून दिल्ली येथे परत गेली असल्याचे भासवण्यासाठी व पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा मोबाईल फोन चालू स्थितीत राजधानी एक्सप्रेस ट्रेनमध्ये ठेवून दिला.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोहवा मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि एम्स पोलीस ठाण्याचे पोउनि शिवांशू सिंग यांनी केली आहे.

Web Title: Drishyam movie style murder finally solved Accused arrested by police from Girij in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.