आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि मॉडल संजना गणेशन ( Sanjana Ganesan) यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 01:43 PM2021-03-11T13:43:13+5:302021-03-11T13:43:40+5:30

whatsapp join usJoin us
When Suryakumar teased Jasprit Bumrah's rumoured future partner Sanjana Ganesan prior to IPL 2020 - see post | आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल

आप किस की तरफ हो?; सूर्यकुमार यादवनं विचारला होता संजना गणेशनला प्रश्न, जसप्रीत बुमराहच्या लग्नाच्या चर्चेत ट्विट व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सध्याच्या जगात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. त्यामुळे सेलिब्रेटीही क्वचितच स्वतःला सोशल मीडियापासून दूर ठेवतातय त्यात आता भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि मॉडल संजना गणेशन ( Sanjana Ganesan) यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे. जसप्रीत बुमराहनं भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीपाठोपाठ पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेतूनही माघार घेतली. त्यानं वैयक्तिक कारण सांगत BCCIकडे सुट्टी मागितली आणि त्याच्या या सुट्टीमागे लग्न हे कारण असल्याचे समोर आले आहे. पृथ्वी शॉची धडाकेबाज खेळी, २४ चेंडूंत पाडला ११० धावांचा पाऊस; मोडला मोठा विक्रम

बुमराह दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं, परंतु अभिनेत्रीच्या आईनं या अफवा असल्याचे सांगितले. त्यात आता तो संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.  SportsKreeda या वेबसाईटच्या वृत्तानुसार संजना आणि जसप्रीत यांचे लग्न ( Jasprit Bumrah Marriage) गोवा येथे होणार आहे. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजना भारतीय गोलंदाजाची मुलाखत घेत आहे. इस्लाम स्वीकारलं म्हणून फलंदाजीत सुधारणा झाली, भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले; पाकिस्तानी खेळाडूचं विधान 

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) याचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे. त्यानं संजना गणेशनची फिरकी घेतली होती आणि त्यावर त्याला तिच्याकडून उत्तरही मिळालं होतं.  Video : विचित्र पद्धतीनं बाद झाला श्रीलंकेचा फलंदाज; वेस्ट इंडिजचा संघ अन् कारयन पोलार्ड आरोपीच्या पिंजऱ्यात

पाहा नेमकं काय घडलं होतं...




 

Web Title: When Suryakumar teased Jasprit Bumrah's rumoured future partner Sanjana Ganesan prior to IPL 2020 - see post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.