सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी 

किडनीच्या आजारामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:38 AM2020-08-23T11:38:14+5:302020-08-23T11:45:51+5:30

whatsapp join usJoin us
Sonu Sood came to rescue Ashraf the bat repairer of virat kohli and Sachin Tendulkar   | सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी 

सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट बॅट दुरुस्त करणारे अशरफ चौधरी सध्या अडचणीत आहेत. ज्या बॅटींनी कोहली व तेंडुलकरनं अनेक विक्रम केले, त्या बॅटची अशरफ चौधरी दुरुस्ती करायचे. असा हा कारागिर सध्या एक-एक पैशांसाठी संघर्, करत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या, परंतु एकही क्रिकेटपटू त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. अशात सोनू सूदला ही बातमी समजताच त्यानं मदतीसाठी हात पुढे केला आहे. 

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं अनेकांना मदत केली आहे. ट्विटर हँडरवर त्याच्याकडे दररोज हजारोंच्या संख्येनं मॅसेज येतात. असाच एक मॅसेज एका युजरने केला आणि त्यात त्यानं अशरफ चौधरी यांना मदत करण्याची विनंती केली. सोनू सूदनंही त्वरीत त्यांचा पत्ता शोधण्यास सांगितले आहे. ''पता ढुँढे इस भाई का?''असे सोनू सूदनं ट्विट केलं आहे.


अशरफ मागील काही आठवड्यापासून किडनीच्या समस्येमुळे मुंबईतील एका रुग्णालयात दाखल आहे. अशरफचे शुभचिंतक प्रशांत जेठमलानी त्यांची काळजी घेत आहेत आणि त्यांच्या उपचारासाठी पैसेही गोळा करत आहेत.
मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ अशरफ यांचं दुकान आहे. नुकतेच अशरफ यांच्या भावाचे निधन झाले. जेठमलानी यांनी सांगितले की,''अनेक क्रिकेटपटूंनी अशरफ यांच्या कामाचे पैसे अजून दिलेले नाहीत.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम झॅक क्रॅवलीनं केला! 

होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

Web Title: Sonu Sood came to rescue Ashraf the bat repairer of virat kohli and Sachin Tendulkar  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.