शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली.

By मोरेश्वर येरम | Published: January 23, 2021 04:28 PM2021-01-23T16:28:01+5:302021-01-23T16:31:09+5:30

whatsapp join usJoin us
shubman Gill credits Yuvraj Singh for playing in Australia | शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

शुबमन गिलने ऑस्ट्रेलियातील खेळीचं युवराज सिंगला दिलं श्रेय; सांगितलं जबरदस्त कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिलने ऑस्ट्रेलियात चौथ्या कसोटी केलेल्या दमदार कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. २१ वर्षीय शुबमनने मेलबर्न कसोटीत भारतीय संघात पदार्पण केलं. पंजाबच्या या पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियाच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा न घाबरता सामना केला आणि त्याचं कौतुक केलं जात आहे. 

शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. पण या खेळीमागचं सारं श्रेय त्यानं भारताची माजी अष्टपैलू आणि २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू युवराज सिंग याला दिलं आहे. 

८ वर्षांपासून एकही विजेतेपद नाही, तरीही कोहली कॅप्टन का?, गंभीरचा निशाणा

"आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधी युवराजने मला खूप मदत केली. सराव शिबिरात त्यांनी माझ्याकडून बाऊन्सर्सचा सराव करुन घेतला. वेगवेगळ्या अँगलमधून त्यांनी माझ्यावर बाऊन्सर्स चेंडूंचा मारा करायला लावला आणि त्यानुसार फलंदाजीचा सराव करुन घेतला. मला त्या सरावाची मला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खूप मदत झाली", असं शुबमन म्हणाला. त्याने 'टाइम्स ऑफ इंडिया' या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यात त्यानं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

सिडनी टेस्टनंतर राहुल सरांनी मला मेसेज केला, हनुमा विहारीनं सांगितली जबरदस्त गोष्ट

शुबमनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकूण ६ डावांत ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा कुटल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. 

भारतीय संघात संधी मिळाल्यानंतर सुटकेचा नि:श्वास
"भारतीय संघात पदार्पण झालं आता मला खूप मोकलं वाटतंय. याच दिवसाची मी खूप वाट पाहात होतो. सुरुवातीला मी दडपणाखाली होतो. पण आता खूप बरं वाटतंय. प्रत्येक डावानंतर आत्मविश्वास वाढत गेला", असं शुबमन म्हणाला. ब्रिस्बेन कसोटीत शुबमनचं पहिलंवहिलं कसोटी शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं. त्यावरही त्यानं भाष्य केलं.

धोनी ज्ञानाचा महासागर, दबावात कसं खेळायचं हे त्याच्याकडून शिकलो: शार्दुल ठाकूर

"शतक पूर्ण करू शकलो असतो तर नक्कीच आणखी आनंद झाला असता. खेळपट्टीवर माझा जम बसला होता. त्यामुळे शतक पूर्ण व्हायला हवं होतं. संघाच्या विजयात मी योगदान देऊ शकलो याचा खूप आनंद आहे. या मालिकेत मला खूप काही शिकायला मिळालं आणि एक चांगला क्रिकेटपटू होण्यासाठी त्याची मला नक्कीच मदत होईल", असं शुबमन म्हणाला. यंदाच्या वर्षात दमदार कामगिरी करण्याचं शुबमनचं लक्ष्य आहे. इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी मी खूप मेहनत घेणार आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर यांच्या गोलंदाजीचा सामना करणं खरंच एक आव्हान ठरणार आहे. पण मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे, असंही तो पुढे म्हणाला. 

Web Title: shubman Gill credits Yuvraj Singh for playing in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.