टीम इंडियाबाहेर असलेल्या सरफराज खान याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आक्रमक अंदाजातील फटकेबाजीसह पुन्हा एकदा लक्षवेधून घेतलं आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाकडून खेळताना त्याने अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. या कामगिरीसह विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावण्याचा विक्रम आता सरफराज खानच्या नावे झाला आहे. त्याचा हा आक्रमक अंदाज चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठीही मोठा दिलासा देणारा आहे. कारण मिनी लिलावात अनसोल्ड राहिल्यावर CSK च्या संघाने सरफराज खानवर भरवसा दाखवला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जलद अर्धशतकासह सरफराज खानने सेट केला नवा विक्रम
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित अशा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत याआधी सर्वात जलद अर्धशतकी खेळीचा विक्रम हा अतित शेठ याच्या नावे होता. २०२०-२१ च्या हंगामात त्याने बडोदा संघाकडून खेळताना छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होता. त्याला मागे टाकत सरफराज खान याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
अभिषेक शर्माची धुलाई
पंजाबविरुद्धच्या सामन्यात सरफराज खान पहिल्या चेंडूपासून आक्रमक अंदाजात खेळताना दिसला. १० वे षटक घेऊन आलेल्या अभिषेक शर्माच्या एका षटकात त्याने तब्बल ३० धावा कुटल्या. मयांक मार्कंडे याने सरफराजच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. सरफराज खान याने २० चेंडूंत ३१० च्या स्ट्राईक रेटसह ६२ धावा केल्या. त्याची ही खेळी ७ चौकार आणि ५ षटकाराने बहरलेली होती.
BCCI निवडकर्त्यांना पुन्हा विचार करायला भाग पाडणारी खेळी
पंजाबच्या संघाने दिलेल्या २१७ धावांचा पाठलाग करताना अंगकृष रघुवंशी आणि मुशीर खान यांनी मुंबईच्या संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अर्धसतक भागीदारी रचली. थाकटा भाऊ मुशीर खान २२ चेंडूत २१ धावा करून बाद झाल्यावर सरफराज खान मैदानात आला. पहिल्या चेंडूपासून तो प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर तुटून पडला. सरफराज खानची विक्रमी खेळी BCCI निवडकर्त्यांना पुन्हा एकदा त्याच्याबद्दल विचार करायला भाग पाडणारी अशीच आहे.