ICCनं केला सचिन तेंडुलकरचा 'अपमान'; करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना

अॅशेस कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने अविश्वसनीय खेळी करताना इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 02:42 PM2019-08-28T14:42:58+5:302019-08-28T14:44:11+5:30

whatsapp join usJoin us
Sachin Tendulkar 'insulted' by ICC?; Netizans trolled ICC | ICCनं केला सचिन तेंडुलकरचा 'अपमान'; करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना

ICCनं केला सचिन तेंडुलकरचा 'अपमान'; करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : अॅशेस कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात बेन स्टोक्सने अविश्वसनीय खेळी करताना इंग्लंडला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे 9 फलंदाज 286 धावांत माघारी परतले होते. विजयासाठी अखेरच्या विकेटला सोबतीला घेऊन बेन स्टोक्सने नाबाद 76 धावांची भागीदारी केली. त्यात जॅक लिचची एक धाव होती, तर स्टोक्सच्या 74 धावा होत्या. स्टोक्सने शतकी झुंज देत 135  धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणत सामना 1 विकेट्सने जिंकला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे. 


या विजयानंतर स्टोक्सचे जगभरात भरभरून कौतुक सुरू आहे. आयसीसीनंही स्टोक्सच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताला एक फोटो पुन्हा शेअर केला. आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचा नायक ठरलेल्या स्टोक्सला महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या हस्ते गौरविण्यात आले, हा तो फोटो होता. त्यावर महान क्रिकेटपटू आणि सचिन तेंडुलकर अशी ओळ लिहीली होती. आयसीसीनं बुधवारी पुन्हा हाच फोटो शेअर करताना स्टोक्सचे कौतुक केले. पण, ते करताना त्यांनी तेंडुलकरपेक्षा स्टोक्स महान असल्याची मस्करी केली. त्यावरून नेटिझन्स चांगलेच खवळले. त्यांनी आयसीसीचा चांगलाच समाचार घेतला.
 
नेटिझन्सने आयसीसीची केली चंपी....





 

Web Title: Sachin Tendulkar 'insulted' by ICC?; Netizans trolled ICC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.