रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम

अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 08:13 PM2019-12-22T20:13:18+5:302019-12-22T20:14:14+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma leaves Virat Kohli behind; Made 'this' feat | रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम

रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कटक : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे.

Image result for rohit sharma most runs than kohli

रोहितने तिसऱ्या सामन्यात आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६३ धावांची दमदार खेळी साकारली. ही खेळी साकरताना रोहितने कोहलीला पिछाडीवर सोडल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर रोहितने २२ वर्षांपूर्वीचा एक विक्रमही यावेळी मोडीत काढला आहे.

Image result for rohit sharma most runs than kohli

रोहितने यंदाच्या वर्षात १४९० धावा केल्या आहेत.  कोहलीने एका वर्षात सर्वाधिक धावा २०१७ साली केल्या होत्या. कोहलीने २०१७ साली १४६० धावा केल्या होत्या. रोहितने त्याच्यापेक्षा एका वर्षात ३० धावा जास्त करत कोहलीला पिछाडीवर टाकले आहे.

रोहित शर्माने मोडला २२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पाहा केला कोणता पराक्रम
भारताचा सलामीवीर आणि उप कर्णधार रोहित शर्माने २२ वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत काढला आहे. हा विक्रम मोडीत काढताना रोहितने भल्या भल्या फलंदाजांना मागे सारले आहे.

रोहितने या एका वर्षात २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या २५ सामन्यांमध्ये रोहितने २४०० धावांचा पल्ला पार केला आहे. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा माजी धडाकेबाद सलामीवीर सनथ जयसूर्याच्या नावावर होता. जयसूर्याने एका वर्षात सलामीवीर म्हणून २३८७ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीतने तब्बल २२ वर्षांनी मोडीत काढला आहे.

भर मैदानात पोलार्ड कोहलीला म्हणाला, 'आय लव्ह यू'
कटक : विराट कोहली आणि किरॉन पोलार्ड हे दोघेही आपल्या देशाचे कर्णधार. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील एक क्षण असा पाहायला मिळाला जेव्हा पोलार्डने कोहलीला 'आय लव्ह यू' म्हटल्याचे पाहायला मिळाले.

या सामन्यात पोलार्डने भारताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. पोलार्डला यावेळी अर्धशतकवीर निकोलस पुरनची चांगली साथ मिळाली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी साकारल्यामुळे वेस्ट इंडिजला ३१५ धावा करता आल्या.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी यांनी पहिली सहा षटके टाकली. त्यानंतर सातव्या षटकात सैनीला पहिले षटक टाकण्याची संधी देण्यात आली. सैनीने या सामन्यात भेदक मारा करत वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजाना बाद केले.
 

Web Title: Rohit Sharma leaves Virat Kohli behind; Made 'this' feat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.