Join us  

Yuzvendra Chahal Dhanashree Verma: युजवेंद्र चहल-धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा? युजीच्या पत्नीने केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:43 PM

Open in App
1 / 6

Yuzvendra Chahal Dhanashree Verma: टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. युझवेंद्र चहल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याची पत्नी धनश्री वर्मा हीदेखील सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या डान्स व्हिडीओ आणि रोमँटिक पोस्टमुळे तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

2 / 6

या दोघांची जोडी सर्वात सुपरहिट जोडप्यांपैकी एक मानली जाते. पण आजकाल ही जोडी वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत असते. चहल आणि धनश्रीच्या चाहत्यांचा असा अंदाज आहे की या जोडीमध्ये आता काही कारणास्तव दुरावा आला आहे. नक्की असं काय झालंय जाणून घेऊया...

3 / 6

आपल्या रोमँटिक सोशल मीडिया पोस्टमुळे कायम चर्चेत असणारी धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलची जोडी सध्या एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी धनश्री वर्मा हिने आपल्या इन्स्टाग्राम युजरनेममधून चहल हे अडनाव काढून टाकल्याने सर्वत्र चर्चा रंगली आहे. यापूर्वी इन्स्टाग्रामवर धनश्रीचे युजर नेम 'धनश्री वर्मा चहल' असे होते.

4 / 6

धनश्रीने काही दिवसांपासून हे नाव बदलून त्यातील चहल हे अडनाव काढून टाकल्याचे दिसतंय. अचानक तिने आपल्या नावामागील चहल अडनाव काढणं सर्वांनाच चकित करून जाणारं आहे. असे का झाले याचा अंदाज लावणं कठीण आहे, पण धनश्री आणि चहल यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचा अंदाज चाहते सतत बांधत आहेत.

5 / 6

धनश्रीनंतर युजी चहलच्या एका इंस्टाग्राम पोस्टनेही अनेक चाहत्यांसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. चहलने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. त्यात असे लिहिले होते की एक नवीन जीवन सुरू होत आहे. याचा अर्थ धनश्री गरोदर आहे असाही अर्थ काढता येऊ शकतो. पण तसं असण्याची शक्यता फार कमी असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

6 / 6

कारण धनश्रीने आपल्या नावामागील चहल हे अडनाव हटवल्याने या पोस्टवरून या दोघांमध्ये काही तरी समस्या असल्याचेच वाटत आहे. अद्याप या जोडप्याच्या बाजूने काहीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. येत्या काही दिवसांत या चर्चांवर पडदा पडून हे नक्की काय सुरू आहे हे स्पष्ट होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतीय क्रिकेट संघइन्स्टाग्रामनृत्यसोशल मीडिया
Open in App