Join us

"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:37 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल गेल्या दीड-दोन वर्षांपासून क्रिकेटपेक्षाही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

2 / 8

युट्यूबर धनश्री वर्मा हिच्याशी युजवेंद्र चहलने कोरोनाकाळात लग्न केलं, पण चार वर्षातच दोघांनी घटस्फोट घेत वाटा वेगळ्या केल्या.

3 / 8

चहल-धनश्रीच्या नात्यात कुणाचं काय चुकलं, याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण आता खुद्द युजवेंद्र चहलनेच आपली चूक कबुल केली आहे.

4 / 8

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये चहलला विचारण्यात आले की, तुमच्या नातं तुटण्यात तुझी चूक काय होती? त्यावर त्याने प्रामाणिक उत्तर दिले.

5 / 8

युजवेंद्र चहल म्हणाला, ' जेव्हा दोन प्रतिभावान माणसं एकत्र येतात, तेव्हा गोष्टी नाजूकपणे हाताळणे गरजेचे असते. कारण दोघांचीही आपापली स्वप्नं असतात.'

6 / 8

'लहानपणापासून प्रत्येकाचे एक स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण करण्याची धडपड सुरू असते. लग्नानंतर पार्टनरने आपल्याला सपोर्ट करावा अशीच साऱ्यांची अपेक्षा असते.'

7 / 8

'आमच्या लग्नानंतर मी खूप गोष्टींनी वेढला गेलो होतो. आयुष्यात बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या. माझा वेळ सगळ्या गोष्टींमध्ये विभागला जात होता.'

8 / 8

'मी खूपच बिझी राहायला लागल्याने मला नात्याकडे अपेक्षित लक्ष देताच आलं नाही. आणि हे जेव्हा सतत व्हायला लागतं, तेव्हा नात्यात दुरावा येतो,' अशी प्रामाणिक कबुली चहलने दिली.

टॅग्स :युजवेंद्र चहलघटस्फोटलग्न