२०२५ हे वर्ष भारतीय महिला क्रिकेटसाठी खास राहिले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं घरच्या मैदानातील वनडे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून इतिहास रचला.
भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनासाठी वर्ल्ड कपस्पर्धेपर्यंत हे वर्ष खूपच भारी ठरले. पण वर्षाकाठी फिल्डबाहेरील कटू गोष्टीमुळेही ती अधिक चर्चेत राहिली. या काळात तिला खास मैत्रीण जेमिमाने दिलेली साथ ही गोष्टही चर्चेचा विषय ठरली.
स्मृती मानधना हिला नॅशनल क्रशचा टॅग लागला आहे. वनडे क्वीन स्मृतीनं यंदाच्या वर्षात क्रिकेटमधील आपला दबदबा दाखवून देताना अनेक विक्रम प्रस्थापित केले.
वर्षाखेर मात्र ती फिल्डबाहेरील वैयक्तिक गोष्टीमुळे चर्चेत आली. प्रेम फुललं लग्नासाठी मंडप सजला अन् लग्नाच्या दिवशीच तिच लग्न मोडलं. वैयक्तिक आयुष्यातील या वादळातून सावरुन ती पुन्हा मैदानात उतरली. ही गोष्टही चर्चेचा विषय ठरली. फिल्डसह फिल्डबाहेरील गोष्टीमुळे यंदाच्या वर्षात सर्वाधिक सर्च केलेल्या महिला क्रिकेटर्सच्या यादीत ती टॉपला राहिली.
ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर क्रिकेटर एलिस पेरी ही देखील सर्वाधिक सर्च झालेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मैदानातील कामगिरीशिवाय ती आपल्या सौंदर्याची जादू दाखवूनही चाहत्यांना घायाळ करून सोडणाऱ्या महिला क्रिकेटरपैकी एक आहे.
तिचा फिटनेस, एखाद्या अभिनेत्रीसारखी अदाकारी आणि रेड कार्पेटवरील तिचा लूक यामुळे ती कायम चर्चेत असते. भारतीय चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता मोठी आहे.
भारतीय क्रिकेट संघातील वर्ल्ड चॅम्पियन संघाचा भाग असलेली हरलीन देओलही यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चित चेहऱ्यांपैकी एक राहिली.
वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत तिने थेट मोदींना ब्युटी सिक्रेटसंदर्भात प्रश्न विचारला होता. हा मुद्दा चांगलाच गाजला. याशिवाय WPL 2025 दरम्यान तिचे स्टायलिश आउटफिट्स आणि इंस्टाग्राम रील्स प्रचंड व्हायरल झाले. त्यामुळे ती सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील झाली.
न्यूझीलंडची अमेलिया केर हिच्या फॅन फॉलोअर्समध्ये २०२५ मध्ये कमालीची वाढल्याचे पाहायला मिळाले.
तिची मैदानातील झलक ही अनेक चाहत्यांना क्लीन बोल्ड करणारी ठरते. सौंदर्यासह फिल्डवरील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ती सर्वात सर्च झालेल्या महिला क्रिकेटच्या यादीत तिचाही समावेश झाल्याचे दिसते.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट तिच्या क्लासी आणि एलिगंट व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. ICC महिला वर्ल्ड कप स्पर्धेत तिने मैदानातील आपल्या खेळीसह खास छाप सोडली.
तिची फलंदाजी जितकी आकर्षक आहे, तितकीच तिची स्टाईलही चर्चेचा विषय ठरली. ही गोष्ट तिला सर्वाधिक सर्च केलेल्या महिला क्रिकेटरच्या यादीत नेऊन बसवणारी ठरली.