Join us

India vs Pakistan Final WTC 23 scenarios :... तर भारत-पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार, क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 16:46 IST

Open in App
1 / 7

WTC 23 Final scenarios: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोण खेळणार हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. World Test Championship 2021-2023 च्या पर्वातील अद्याप ९ मालिका शिल्लक आहेत आणि त्यानुसार जर आकडेवारी केली, तर भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) या दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये जेतेपदाची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 / 7

श्रीलंका-पाकिस्तान यांच्यातली कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानंतर यजमान श्रीलंकेने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, परंतु त्यांना अव्वल दोनमध्ये प्रवेश करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. श्रीलंकेच्या खात्यात सध्या ५३.३३ टक्के आहेत. श्रीलंकेला उर्वरित दोन कसोटींत न्यूझीलंडचा सामना करायचा आहे आणि या दोन्ही जिंकल्यास त्यांची टक्केवारी ६१.१ अशी होईल, परंतु १-१ असा निकाल लागल्यास टक्केवारी घसरून ५२.७८ इतकी होईल.

3 / 7

पाकिस्तानचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे.. श्रीलंका, भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांची टक्केवारी ५० ते ५३.३३ टक्क्यांच्या आत आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध तीन व न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पाकिस्तानने या पाचही कसोटी जिंकल्यास त्यांची टक्केवारी ६९.०५ इतकी होईल. या दोन मालिकांमधून त्यांनी ४८ गुण कमावले ( चार विजय व १ पराभव) तर त्यांची टक्केवारी ६१.९ इतकी राहिल.

4 / 7

सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिकेचा संघ ७१.४३ टक्क्यांसह आघाडीवर आहे. त्यांच्या इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध प्रत्येकी ३ अशा सहा कसोटी आणि घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी शिल्लक आहेत. त्यांनी घरच्या मैदानावरील विंडीजविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकल्या तरी त्यांना टक्केवारी ही ६०च्या वर ठेवावी लागणार आहे. त्यांनी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका १-२ अशी गमावली आणि विंडीजला २-० असे नमवल्यास त्यांची टक्केवारी ६० इतकी राहिल.ा परदेशातील एकही मालिका त्यांनी २-१अशी जिंकली आणि एक १-२ अशी गमावल्यास त्यांची टक्केवारी ६६.६७ इतकी होईल.

5 / 7

ऑस्ट्रेलियाच्या ९ कसोटी शिल्लक आहेत. त्यापैकी पाच घरच्या मैदानावर, तर चार भारतात होणार आहेत. वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी दोन कसोटी घरच्या मैदानावर होणार आहेत. ऑसींनी घरच्या मैदानावरील पाचही कसोटी जिंकल्यास व भारताविरुद्धची मालिका गमवल्यास त्यांची टक्केवारी ६३.१६ इतकी होईल आणि भारताने त्यांच्या उर्वरित सहा कसोटी जिंकल्यास ते ऑसींना मागे टाकतील. ९ पैकी ऑसींनी ६-३ असा निकाल लावल्यास ६८.४२ टक्क्यांसह त्यांचे अंतिम फेरीतील स्थान पक्के होईल.

6 / 7

भारतीय संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना बांगलादेश ( दोन कसोटी ) व ऑस्ट्रेलिया ( ४ कसोटी) यांच्याविरुद्धच्या सहाही कसोटी जिंकाव्या लागतील. तर भारताची टक्केवारी ६८.०६ इतकी होईल, म्हणजेच ऑस्ट्रेलिया त्यांच्या घरच्या मैदानावरील पाचही कसोटी जिंकून टक्केवारीत मागे राहिल. अशा परिस्थितीत भारत-पाकिस्तान यांनी त्यांच्या उर्वरित कसोटी जिंकल्यास आणि दक्षिण आफ्रिकेची घसरण झाल्यास कट्टर प्रतिस्पर्धी लॉर्ड्सवर २०२३मध्ये जेतेपदाचा सामना खेळतील.

7 / 7

इंग्लंडने उर्वरित सहा कसोटी जिंकल्यास त्यांची टक्केवारी ५१.५२ इतकी होईल आणि ते न्यूझीलंडला ( ४८.७२) मागे टाकलीत. वेस्ट इंडिजने उर्वरित कसोटी जिंकल्यास ते ६५.३८ टक्क्यांपर्यंतच पोहोचतील.

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध पाकिस्तानआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका
Open in App