Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL 2026 Auction : ८ मार्की प्लेयर्समध्ये 'या' दोघींची बेस प्राइज ५० लाखांपेक्षा कमी; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:55 IST

Open in App
1 / 11

WPL 2026 साठी २७ नोव्हेंबर, २०२५ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या महिला खेळाडूंच्या मेगा लिलावातील ८ मार्की प्लेयर्सची यादी समोर आली आहे.

2 / 11

WPL 2026 च्या मेगा लिलावातील मार्की प्लेयर्सच्या यादीतील २ भारतीय तर ६ परदेशी महिला खेळाडूंचा समावेश आहे.

3 / 11

भारताची वर्ल्ड चॅम्पियन रेणुका सिंह ठाकूरसह महिला वर्ल्ड कप स्पर्धा गाजवणारी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा या दोघी मार्की प्लेयर्समध्ये ५० लाखांपेक्षा कमी प्राइज टॅग असणाऱ्या खेळाडू आहेत.

4 / 11

भारताची जलदगती गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर हिने ४० लाखांच्या बेस प्राइजसह WPL मेगा लिलावासाठी नाव नोंदणी केली आहे.

5 / 11

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमांची 'बरसात' करणाऱ्या लॉरा वॉल्व्हार्ड हिने ३० लाख बेस प्राइजसह मेगा लिलावात नोव नोंदणी केली आहे. यंदाच्या मेगा लिलावात तिला आपल्या संघात घेण्यासाठी पाच फ्रँचायझीमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळेल. मूळ किंमत लाखात असली तरी ही छोरी मेगा लिलावात कोट्याधीश होऊ शकते.

6 / 11

मार्की प्लेयर्समधील भारताच्या दीप्ती शर्मासह ६ जणींनी ५० लाख प्राइज टॅगसह नाव नोंदणी केली आहे. दीप्तीनं महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे WPL मेगा लिलावात तिच्यासाठी कोट्यवधींची बोली लागू शकते.

7 / 11

न्यझीलंडची सोफी डिव्हाइन (५० लाख मूळ किंमत) ब्रेकनंतर पुन्हा WPL मध्ये जलवा दाखवण्यासाठी तयार आहे. पॉवर हिंटिंगसह गोलंदाजीत उपयुक्त ठरणाऱ्या या मार्की प्लेयर्सवरही कोट्यवधीची बोलू लागली तर नवल वाटणार नाही.

8 / 11

इंग्लंडची सोफी एसलस्टोन लेफ्ट-आर्म स्लो ऑर्थोडॉक्स स्पिनसह फलंदाजीतही धमाका करण्यात सक्षम आहे. ५० लाख मूळ किंमतीही WPL मेगा लिलावात उतरलेल्या या खेळाडूलाही बेस प्राइज टॅगपेक्षा अधिक रक्कम अगदी सहज मिळेल.

9 / 11

ऑस्ट्रेलियाची एलिसा हीली ही फक्त खेळाडूच्या रुपातच नाही तर कॅप्टन्सीचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे WPL मेगा लिलावात तिच्यासाठी मोठी किंमत मोजण्यासाठी फ्रँचायझी संघ नक्कीच हिंमत दाखवतील.

10 / 11

मेग लेनिंग हिने आपल्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला सलग तीन हंगामात फायनलमध्ये नेले आहे. पुन्हा एकदा दिल्लीचा संघ तिच्यावरमोठी बोली लावणार का? ते पाहण्याजोगे असेल.

11 / 11

अमेलिया केर ही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना दिसली आहे. WPL च्या मेगा लिलावात ५० लाख प्राइज टॅगसह नाव नोंदणी करणाऱ्या आणि मार्की प्लेयरच्या यादीत असलेल्या या ऑलराउंडरवर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स फ्रँचायझी संघाच्या नजरा असतील.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेटबीसीसीआयमुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर