महिला प्रीमीयर लीगच्या चौथ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ दमदार कामगिरी करत प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ ठरला.
RCB च्या ताफ्याची कर्णधार आणि नॅशनल क्रश स्मृती मानधनासह या संघातील अनेक चेहरे मैदानातील कामगिरीशिवाय सौंदर्य अन् खास अदाकारीमुळे चर्चेत आहेत. त्यातील एक नाव म्हणजे लॉरेन बेल.
जवळपास ६ फूट उंच अन् सौंदर्याची खाणं असलेली ही सुंदरी अदाकारी अन् स्टायलिश अंदाजाच्या बाबतीत हॉलिवूड आणि बॉलिवडमधील अभिनेत्रींनाही टक्कर देणारी आहे.
लॉरेन बेल ही सौंदर्य स्पर्धेत उतरली तर नंबर वनचा ताज मिरवेल, अशा काही प्रतिक्रिया तिच्या व्हायरल फोटोवर उटताना दिसत आहे.
इथं जाणून घेऊयात RCB च्या प्रत्येक मॅचमध्ये कामगिरीसह आपल्या खास अदाकारीनं लक्षवेधी ठरणाऱ्या या सुंदरी संदर्भातील खास गोष्ट
लॉरा केटी बेल ही एक इंग्लिश क्रिकेटर आहे. गोलंदाजीसह फलंदाजीतील तुफान फटकेबाजीसह सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.
९० लाख रुपये बोली लावून WPL च्या यंदाच्या हंगामात RCB नं तिला आपल्या ताफ्यात घेतलं. एवढेच नाही तर प्रत्येक सामन्यात ती प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे.
२४ वर्षीय युवा महिला क्रिकेटनं इंग्लंडच्या संघाकडून ३६ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ५० विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत तिच्या खात्यात ३१ सामन्यात ४४ तर कसोटीत ५ सामन्यात तिच्या खात्यात १८ विकेट्स जमा आहेत.
क्रिकेटच्या मैदानातील खास कामगिरीशिवाय स्टायलिश अंदाजामुळे ती चर्चेत असते. सोशल मीडियावर ती अनेकदा हॉट अँण्ड बोल्ड अंदाजातील फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवरुन फक्त २०० पोस्ट शेअर करताना तिने १. मिलीयन चाहतावर्ग कमावला आहे. ती फक्त ६७१ लोकांना फॉलो करते. WPL च्या यंदाच्या हंगामानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये भारतीय चाहत्यांचीही भर पडत असल्याचे दिसून येत आहे.