Join us
Daily Top 2Weekly Top 5

WPL 2026 : स्मृती-शेफालीसह पुन्हा एकदा या ३ परदेशी चेहऱ्यांचा दिसेल जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 20:59 IST

Open in App
1 / 10

इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट ही WPL इतिहासातील सर्वात प्रभावी ठरलेल्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. मागील हंगामात १५२.४७ च्या स्ट्राईक रेटसह तिने सर्वाधिक ५२३ धावांसह हंगाम गाजवला होता.

2 / 10

बॅटिंगशिवाय नॅट सायव्हर-ब्रंट गोलंदाजीतही मोलाची भूमिका बजावण्यात माहित आहे. गत हंगामात ७.९४ च्या इकॉनॉमीसह तिने १२ विकेट्स घेतल्या होत्या. यंदाच्या हंगामात MI साठी ती पुन्हा ट्रम्प कार्ड ठरू शकते.

3 / 10

WPL मध्ये स्मृती मानधना पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करताना दिसेल. एलिसा पेरीनं यंदाच्या हंगामातून माघार घेतल्यामुळे स्मृतीवर अतिरिक्त जबाबदारी असेल.

4 / 10

WPL 2025 च्या हंगामात स्मृती मानधनाला चमक दाखवता आली नव्हती. पण यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिचा धमाकेदार शो पाहायला मिळाला होता. टीम इंडियाकडून ४८ चेंडूत केलेली ८० धावांची खेळी RCB ला मोठा दिलासा देणारी अशी होती.

5 / 10

भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील सहा आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी चार सामन्यांत तिने ६८ पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा काढल्या आहेत.

6 / 10

मागील WPL हंगामात शेफालीनं १५२.७६ च्या स्ट्राईक रेटसह ३०४ धावा करत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात मोलाची कामगिरी केली होती. यावेळी जेमीच्या नेतृत्वाखालील ती आपला धमाका कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

7 / 10

इंग्लंडची स्टार फिरकी गोलंदाज सोफी एक्लेस्टन हिला WPL२०२६ लिलावात यूपी वॉरियर्सनं RTM कार्डद्वारे पुन्हा संघात कायम ठेवलं आहे.

8 / 10

व्हाइट-बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मानली जाणारी एक्लेस्टन अलीकडे शानदार कामगिरी करत आहे. महिला वनडे विश्वचषकात खास छाप सोडल्यानंतर आता ती WPL मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे.

9 / 10

ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ॲश्ले गार्डनर गुजरात जायंट्सची कर्णधार म्हणून पुढेही संघाचं नेतृत्व करणार आहे. गेल्या तीन हंगामांत तिनं गुजरातसाठी २५ WPL सामने खेळले असून ५६७ धावा आणि २५ विकेट्स घेतल्या आहेत.

10 / 10

WPL २०२५ च्या हंगामात गार्डनरनं १६४. १८ च्या स्ट्राईक रेटसह २४३ धावांसह ८.०३ च्या इकॉनॉमीने ९ विकेट्सही घेतल्या होत्या.

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगमहिला टी-२० क्रिकेटस्मृती मानधनाशेफाली वर्माबीसीसीआय