WPL 2024: पर्व दुसरे! महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारं व्यासपीठ; २३ तारखेपासून थरार

WPL 2024 Schedule: २३ फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होत आहे.

आयपीएलप्रमाणे महिला क्रिकेटपटूंना देखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं या उद्देशाने मागील वर्षीपासून महिला प्रीमिअर लीग ही स्पर्धा खेळवली जाते. या स्पर्धेचा पदार्पणाचा हंगाम केवळ मुंबईत खेळवला गेला होता.

दुसऱ्या हंगामात मात्र मुंबईत एकही सामना होणार नाही. दिल्ली आणि बंगळुरू येथे ही स्पर्धा खेळवली जाईल. २३ फेब्रुवारीपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होत आहे.

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे पाच संघ मैदानात असतील. गतविजेच्या मुंबई आणि दिल्ली यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.

मुंबईच्या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर, आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग, बेथ मूनीकडे गुजरातच्या संघाची धुरा आणि यूपी वॉरियर्सचे नेतृत्व ॲलिसा हिली करत आहे.

मुंबई इंडियन्सने जेतेपदाचा पहिला मान पटकावला होता. पण, यंदाच्या पर्वात एकही सामना मुंबई अथवा नवी मुंबईत होणार नाही.

२३ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू व नवी दिल्ली येथे खेळवली जाणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात २३ फेब्रुवारीला उद्घाटनीय सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. महिला प्रीमिअर लीगमधील सर्व लढती सायंकाळी ७.३० वाजल्यापासून सुरू होतील.

हरमनप्रीत कौर (कर्णधार), प्रियंका बाला, यास्तिका भाटिया, सायका इशाक, शबनिम इस्माईल, फातिमा जाफर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली सीव्हर, पूजा वस्त्राकर, सजीवन सजना, सत्यमूर्ती बालकृष्णन कीर्थना, अमनदीप कौर.

मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, लौरा हॅरिस, शेफाली वर्मा, स्नेहा दीप्थी, एलिसे कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, अरूंधती रेड्डी, अश्वनी कुमारी, जेस जोनासेन, मरिझेन कॅप, मिन्नू मनी, राधा यादव, शिखा पांडे, अपर्णा मंडल, तानिया भाटिया,पूनम यादव, तितस साधू.

बेथ मूनी (कर्णधार), स्नेह राणा, लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिथा, वेदा कृष्णमूर्ती, ॲश्लेघ गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, कॅथरीन ब्राइस, तनुजा कान्वेर, काशवी गौतम, लॉरेन चीटल, मन्नत कश्यप, मेघना सिंग, शबनम शकील.

स्मृती मानधना (कर्णधार), दिशा कसत, आशा शोभना, एलिसे पेरी, हेथर नाईट, कानिका अहुजा, श्रेयांका पाटील, सोफी डिव्हाइन, इद्रांनी रॉय, रिचा घोष, रेणुका सिंग, एकता बिश्त, केट क्रॉस, सिमरन बहादूर, जॉर्जिया वेअरहॅम, सबिनेनी मेघना, शुभा सथीश, सोफी मोलिनक्स.

ॲलिसा हिली (कर्णधार), किरण नवगिरे, श्वेता सेहरावत, लक्ष्मी यादव, वृंदा दिनेश, डॅनील व्यॉट, अंजली सर्वनी, लौरेन बेल, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुल्ताना, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, पार्श्ववी चोप्रा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, पूनम खेमनार, सायमा ठाकोर.