वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं राष्ट्रपतींसोबत ट्रॉफीसह फोटो काढला.
राष्ट्रपतींनी संघातील खेळाडूंशी खास गप्पा गोष्टीही केल्या. भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधनासोबतसह अन्य खेळाडूंचा राष्ट्रपती भवनातील रुबाब एकदम झक्कास असाच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच हरमनप्रीत कौरनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारतीय संघातील खेळाडूंची स्वाक्षरी असणारी खास जर्सी भेट स्वरुपात दिली.
राष्ट्रपतीभवनातील वर्ल्ड चॅम्पियन संघातील सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत खास फोटो सेशनही केले.
याआधी भारतीय संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
भारतीय महिला संघाच्या या भेटीतील एका फोटोत अनजोत कौर ही मेडलशिवाय स्पॉट झाली होती. तिने संघातील सहकारी आणि मेडल न मिळालेल्या प्रतिकाला आपले मेडल दिलं अशी चर्चा या फोटोतून रंगली.
राष्ट्रपती भवनातील फोटो सेशनमध्ये मात्र दोघीही आपापल्या मेडलसह दिसल्या. त्यामुळे अमनजोत कौरसह प्रतिकालाही मेडल मिळाल्याचे चित्र या फोटोतून स्पष्ट झाले.