Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैभव सूर्यवंशीनं अचानक चिकन-मटण खाणं का सोडलं? वडिलांनी केला खुलासा, कारण ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:33 IST

Open in App
1 / 7

आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ चा खिताब जिंकून मायदेशी परतलेला टीम इंडियाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या राजस्थान रॉयल्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये आहे. वैभव याठिकाणी आयपीएल २०२६ च्या सामन्यांसाठी प्रॅक्टिस करत आहे.

2 / 7

वैभव सूर्यवंशी जास्तीत जास्त मेहनतीवर भर देत आहे जेणेकरून त्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता येईल. टीम इंडियाच्या सीनिअर टीमची जर्सी घालणे आणि आपल्या देशासाठी भविष्यात वर्ल्ड कप अथवा टी-२० वर्ल्ड कप खेळण्याचा इरादा वैभवचा आहे. वैभवने हे स्वप्न साकार करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मांसाहार न करण्याचा...

3 / 7

वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, त्यांच्या मुलाने आता मटण आणि चिकन खाणे सोडून दिले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाचे कारण वैभवचा फिटनेस आहे. त्याला लवकरच सीनिअर भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे आणि २०२८ च्या टी-२० विश्वचषकात खेळायचे आहे. म्हणून त्याच्यासाठी फिटनेस आवश्यक आहे.

4 / 7

वैभवला मटण आणि चिकन किती आवडते हे आता सर्वांना माहिती आहे. तो पूर्वी ते खूप आवडीने खात असे पण आता तो त्याचे आवडते पदार्थ सोडण्यास मागेपुढे पाहत नाही असं त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

5 / 7

वैभव जेवतो काय? - वैभव आता मांसाहारीपासून शाकाहारी झाला आहे. तो आता मटण आणि चिकनपासून मसूर आणि हिरव्या भाज्यांकडे वळला आहे असं त्याच्या वडिलांनी म्हटलं. वैभव आता मटण आणि चिकनपेक्षा जास्त पनीर खातो असं मुलाखतीत त्याच्या वडिलांनी खुलासा केला.

6 / 7

या मुलाखतीत जेव्हा संजीव सूर्यवंशी यांना वैभव सूर्यवंशीच्या सीनिअर भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या शक्यतांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, माझा मुलगा यासाठी तयार आहे. आता त्याला कधी संधी द्यायची हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ठरवायचे आहे.

7 / 7

तर वैभव सूर्यवंशीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी आधीच एका मुलाखतीत दावा केला आहे की, आयपीएल २०२६ नंतर वैभवला भारताच्या टी२० संघात संधी मिळू शकते. कारण वैभव सूर्यवंशी तोपर्यंत १५ वर्षांचा असेल, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आंतरराष्ट्रीय स्तरावर वरिष्ठ संघात खेळण्यासाठी खेळाडूसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसीबीसीसीआयवैभव सूर्यवंशीआयपीएल २०२४