सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा बुधवारी साखरपुडा पार पडला. अर्जुन तेंडुलकर ज्या मुलीशी लग्न करणार आहे ती त्याची दीर्घकाळची प्रेयसी सानिया चांडोक आहे.
सानिया चांडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती अब्जाधीशांच्या कुटुंबातील असली तरीही ती स्वत:देखील उद्योजिका असून मुंबईत तिचा स्वत:चा एक खास पद्धतीचा व्यवसाय आहे.
सानियाचे आजोबा रवि घई हे पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलचे मालक आहेत तसेच, ते ब्रुकलिन क्रीमरीसारख्या व्यवसायात सक्रिय आहेत. जे आरोग्यासाठी अनुकूल आइस्क्रीम आणि फ्रोझन स्वीट्स बनवतात.
सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. ती अर्जुन तेंडुलकरची सख्खी बहिण सारा तेंडुलकरच्या हिच्यासोबत बरेच वेळा दिसली आहे. त्या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांचे एकत्र फोटोही आहेत.
सानिया चांडोक हिचा स्वतःचा खास व्यवसाय आहे. ती मुंबईमध्ये प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर चालवते. 'मिस्टर पॉज'ची असे त्याचे नाव असून ती त्याची संस्थापक आहे. आपल्या व्यवसायाप्रति ती खूप मेहनती आहे.
मिस्टर पॉज हे पेट स्पा, सलून आणि स्टोअर मुंबईतील उच्च्रभू अशा वरळी परिसरात आहे. सानिया चांडोक ही त्याची संस्थापक असून ती स्वत: वेटेरनरी टेक्निशिअन आहे. तिने WVSचा ABC प्रोग्रामही पूर्ण केला आहे.
सानियाला पाळीव प्राण्यांमध्ये खूप रस आहे आणि त्यांच्याबद्दल मायाही आहे. ती प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी अनेक मोहिमांमध्ये सहभागी झालेली आहे. लोकांनी प्राण्यांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे, असे तिचे मत आहे.
सानिया चांडोक आणि अर्जुन तेंडुलकर यांचा साखरपुडा झाल्याची अधिकृत माहिती अद्याप दोन्हीही कुटुंबाकडून देण्यात आलेली नाही. परंतु, काही प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसारित केले असल्याने सानियाच्या नावाची चर्चा रंगली आहे.