Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?

Matthew Hayden duaghter Grace Hayden Photos: मॅथ्यू हेडनच्या मुलीची सध्या क्रिकेटवर्तुळात खूपच चर्चा रंगली आहे

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत आहे. पण भारतात मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याची मुलगी ग्रेस हेडन हिची चर्चा रंगली आहे.

ग्रेस हेडन ही २३ वर्षांची आहे. नुकताच १६ जूनला ग्रेस हिने आपला वाढदिवस साजरा केला. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही खास गोष्टी...

ग्रेस ही स्पोर्ट्स प्रेझेंटर आणि अँकर आहे. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया BGT ट्रॉफीदरम्यान ती कसोटी मालिकेत अँकरच्या भूमिकेत दिसली होती.

तिने IPL आणि ICC च्या विविध स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केले आहे. नुकतीच ती पाकिस्तान सुपर लीगच्या स्पर्धांमध्येही दिसली होती.

सौंदर्याच्या बाबतीत ग्रेस ही बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अभिनेत्रींपेक्षा जराही कमी नाही. तसेच स्पोर्ट्सची संबंधित असल्याने ग्रेसचा फिटनेसदेखील उत्तम आहे.

वडील मॅथ्यू हेडन क्रिकेटपटू असल्याने ग्रेसला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड आहे. ती याबद्दल सोशल मीडियावरही मोकळेपणाने बोलते.

ग्रेसचे वडील ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सलामीवीर होते. ऑस्ट्रेलियाने अनेक वर्ल्डकप आणि सिरिज जिंकल्या. पण ग्रेसला मात्र ऋषभ पंत सर्वाधिक आवडतो.

ग्रेस हेडनची सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी खूपच घट्ट मैत्री आहेत. त्या दोघी बहुतेक वेळा एकत्र प्रवास करताना दिसल्या आहेत.

ऑस्ट्रेलियातील विविध ठिकाणी सारा आणि ग्रेस भटकंती करताना दिसतात. समुद्रकिनाऱ्यांपासून ते शॉपिंग स्ट्रीटपर्यंत सर्व जागा त्या एकत्र एक्स्पोलर करतात.

ग्रेस हिचा नुकताच भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय सोबत डिनर करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून यांच्यात डेटिंग सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या.

ग्रेस ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसाठी तिचे सुंदर फोटो शेअर करते.

ग्रेस हेडनला भारताचेही खूप कौतुक आहे. ती म्हणते- "मला भारत खूप आवडतो. मी लहान असताना माझ्या वडिलांकडून भारताबद्दल खूप ऐकले होते."

"माझे वडिल भारतातून परत येताना खूप मसाले आणायचे. त्यामुळे मला भारतीय जेवण, खाणं, डाळ रोटी सगळं खूप आवडतं," असं ग्रेस हेडन सांगते.

सर्व फोटो- ग्रेस हेडन इन्स्टाग्राम (Grace Hayden Instagram)