ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ख्रिस लिन ( Chris Lynn) यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये धमाल उडवली आहे. BBLमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपतेय. पण, सोशल मीडियावर वेगळ्याच कारणामुळे त्याची चर्चा रंगली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याची ही चर्चा रंगलीय.
मुंबई इंडियन्सचा हा माजी खेळाडू योगा टिचरला डेट करतोय आणि या दोघांच्या प्रेमाची साक्ष देणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ख्रिस लिन कॅर्लीए अँड्य्रूजला डेट करतोय. ती योगा टिचर आणि पायलेट इंस्ट्रक्टर आहे. या दोघांनी ख्रिस्मसच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Karlie Andrews ही ऑस्ट्रेलियातच राहणारी आहे. ती योगासोबत डान्सही शिकवते.
Karlie Andrews ने आधी मार्केटींग आणि इव्हेंट्स इंडस्ट्रीत काम केले आहे.
आयपीएल, बिग बॅश लीगसह ख्रिस लीन अनेक फ्रँचायझी लीगमध्ये खेळतोय. आयपीएलमधूनच त्यानं २८.६ कोटी कमावले आहेत.
मुंबई इंडियन्सनं त्याला २ कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. पण, क्विंटन डी कॉकच्या उपस्थितीत त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही.