Join us

दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:29 IST

Open in App
1 / 7

भारतीय संघाने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. रोहित शर्माने नाबाद १२१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. विराट कोहलीनेही नाबाद अर्धशतक ठोकले. विजयानंतर त्याने रोखठोक मत मांडले.

2 / 7

'जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने घडत नाहीत, तेव्हा तुमच्यासमोर खूप आव्हानं उभी राहतात. पण अशी आव्हाने तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करून घेतात आणि तुम्हाला यशस्वी करतात'

3 / 7

'रोहितबरोबर फलंदाजी करणं मला खूप सोपं गेलं. आम्ही दोघांनी सामना जिंकवला याचा मला आनंद आहे. रोहित आणि मी खूप वर्षांपासून एकत्र खेळतोय. त्यामुळे आम्ही एकमेकांना नीट समजू शकतो.'

4 / 7

'आम्हा दोघांनाही सुरुवातीपासूनच खेळाची उत्तम समज आहे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला खेळ समजून घेणं जमलंच पाहिजे. सुरुवातीपाासूनच आम्ही एकत्र खेळून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारलीये.'

5 / 7

'२०१३ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच आमच्या पार्टनरशिपची सुरुवात झाली. आता सगळ्यांना माहितीये की, आम्ही २० षटके एकत्र खेळलो तर सामना भारताच्या बाजूने झुकणार.'

6 / 7

'मालिकेच्या सुरुवातीला दोनदा शून्यावर बाद झालो होतो. आज पहिली धाव घेतल्यावर खूप बरं वाटलं. इतके वर्ष खेळूनसुद्धा एक धाव काढणे किती कठीण असते, ते क्रिकेटने मला दाखवून दिलं.'

7 / 7

'ऑस्ट्रेलियामध्ये येणं आम्हाला कायमच आवडतं. या देशात आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो. इथल्या प्रेक्षकांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी सगळ्यांचे आभार,' असे विराट म्हणाला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीआॅस्ट्रेलियारोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ