Vamika Meaning: ... म्हणून विराट-अनुष्का यांनी कन्येचं नाव 'वामिका' असं ठेवलं!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं ( Anushka Sharma) सोमवारी पती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत कन्येचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत विराट व अनुष्का त्यांच्या लाडक्या लेकीला प्रेमानं पाहताना दिसत आहेत.

अनुष्कानं हा फोटो पोस्ट करून कन्येचं नाव काय असेल, यावरील सस्पेन्सही मिटवला. विराट व अनुष्का यांनी त्यांच्या मुलीचं नाव वामिका ( Vamika) असे ठेवले आहे. असं नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. पण, दोघांच्याही चाहत्यांना हे असं नाव का ठेवलं आणि त्याचा अर्थ काय, हा प्रश्न पडला आहे.

विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता.

या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि 2017 साली दोघांनी इटलीत लग्न केले.

११ जानेवारीला विराट-अनुष्काच्या घरी ही नन्ही परी जन्माला आली. तेव्हा विराटनं पोस्ट लिहिली होती की,'' आम्हा दोघांना हे सांगताना आनंद होतोय की आज दुपारी आमच्या घरी कन्येनं जन्म घेतला. अनुष्का व लेक, दोघंही ठीक आहेत.''

मुलीच्या जन्मानंतर विराट व अनुष्का यांनी फोटोग्राफर्सना फोटो न घेण्याचे आवाहन केलं होतं आणि सोशल मीडियावर लिहिलं होतं की,''आशा करतो की आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर कराल.''

विराट व अनुष्का यांच्याप्रमाणे मुलीचं नावही खास आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे. यात विराटचा 'व' आणि अनुष्काचा 'का' याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा... हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. अनुष्कानं ही पोस्ट केल्यानंतर मिनिटांतच लाखोंनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला.

लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्कानं विषेश कॅप्शनही लिहिली. तिनं लिहिले की,''आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.''

माझं संपूर्ण जग एका फ्रेममध्ये!; अनुष्काच्या पोस्टवर विराटची कमेंट