Join us

क्रिकेटच्या रणांगणात अधिराज्य गाजवणारा ‘किंग’! कोहलीनं सेट केलेले ५ 'विराट' विक्रम मोडणं अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:53 IST

Open in App
1 / 8

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटच्या मॉडर्न जमान्यातील रनमशिन विराट कोहली ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

2 / 8

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या या भारतीय स्टारला क्रिकेटच्या मैदानातील 'किंग' असंही म्हटलं जाते.

3 / 8

इथं नजर टाकुयात त्याच्या नावे असलेल्या ५ महारेकॉर्डवर जे तोडणं अशक्य असेच आहे.

4 / 8

वनडे क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकवणारा विराट कोहली हा पहिला आणि एकमेवर फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत वनडेत ५१ शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकरला मागे टाकून कोहलीनं सेट केलेला हा विक्रम कुणी भविष्यात मोडेल, असे वाटत नाही.

5 / 8

वनडेत मोजक्याच क्रिकेटर्संनी १० हजार धावांचा पल्ला गाठला आहे. त्यात कोहली सर्वात जलगदतीने हा डाव साधणारा फलंदाज आहे. त्याने अवघ्या २०५ डावात वनडेत १० हजार धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

6 / 8

कसोटीत भारताकडून सर्वाधिक ७ द्विशतकांचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे. त्याचा हा विक्रम मोडीत काढणंही सोपी गोष्ट नसेल.

7 / 8

टी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने ३५०० धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे. त्याने ९६ डावात हा मोठा विक्रम आपल्या नावे केला होता.

8 / 8

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावांचा विक्रमही कोहलीच्या नावे आहे. २०१६ च्या हंगामात कोहलीनं ९७३ धावा केल्या होत्या. अजूनही त्याच्या या विक्रमाला कुणी धक्का लावू शकलेले नाही.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ