Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 मधील दमदार कामगिरीचं फळ! वैभव सूर्यवंशीसह या ५ खेळाडूंना टीम इंडियात संधी

By सुशांत जाधव | Updated: May 14, 2026 21:07 IST

Open in App
1 / 6

आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरीसह लक्षवेधून घेणाऱ्या ५ युवा खेळाडूंना बीसीसीआयने मोठं गिफ्ट दिलं आहे. वैभव सूर्यवंशीसह वेगवेगळ्या फ्रँचायझी संघाकडून धमक दाखवणाऱ्या खेळाडूंची श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय 'अ' संघात निवड ढाली आहे.

2 / 6

राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याला अपेक्षेनुसार भारतीय 'अ' संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमधील ११ सामन्यात ४० च्या सरासरीसह ४४० धावा केल्या आहेत.

3 / 6

पंजाब किंग्सच्या ताफ्यातील प्रियांश आर्य यालाही भारतीय 'अ' संघात स्थान मिळाले आहे. त्याने १० सामन्यात ३४२ धावा केल्या आहेत.

4 / 6

पंजाब किंग्सच्या धडाकेबाज सलामीवीर प्रभसिमरन सिंग यानेही तिरंगी वनडे मालिकेसाठी भारतीय 'अ' संघात स्थान मिळवले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातील अर्धशतकासह त्याने ११ सामन्यात ४०० धावांचा टप्पा पार केला.

5 / 6

IPL च्या यंदाच्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघातून लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या मुंबईकर सूर्यांश शेडगे याचाही भारतीय 'अ' संघात समावेश आहे. त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध २९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. याशिवाय छोट्याखानी खेळीसह त्याने आपल्या फलंदाजीची खास धमक दाखवून दिली होती.

6 / 6

चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून गोलंदाजीत हवा करणाऱ्या अंशुल कंबोज हा देखील श्रीलंका दौऱ्यातील तिरंगी मालिकेत भारतीय 'अ' संघाकडून मैदानात उतरणार आहे. ११ सामन्यात त्याने १९ विकेट्स घेतल्या आहेत.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२६बीसीसीआयवैभव सूर्यवंशीभारतीय क्रिकेट संघ