वैभव सूर्यंवशी ते अभिषेक शर्मा! IPL मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज

वैभव सूर्यंवशी याने विक्रमी शतकी खेळात एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा खास विक्रमही आपल्या नावे नोंदवला.

IPL मध्ये सर्वात जलद शतकी खेळी करणारा भारतीय ठरलेल्या वैभव सूर्यंवशी याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या खास विक्रमाचीही बरोबरी केल्याचे पाहायला मिळाले.

राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातील १४ वर्षांच्या या पोरानं गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतकी खेळीत ११ षटकार मारले.

यासह त्याने एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मुरली विजय याच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

मुरली विजय याने चेन्नई सुपर किंग्जकडून २०१० च्या हंगामात एका डावात ११ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते. वैभव सूर्यंवशीनं या विक्रमाशी बरोबरी केलीये.

संजू सॅमसन याने २०१८ च्या हंगामात राजस्थानकडून खेळताना एका डावात १० षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते.

श्रेयस अय्यर याने २०१8 च्या हंगामात एका डावात १० षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

शुबमन गिलनं २०२३ च्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळताना एका डावात १० षटकार मारले होते.

अभिषेक शर्मानं २०२५ च्या हंगामात शतक साजरे करताना १० षटकार लगावल्याचे पाहायला मिळाले.