Join us  

'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 8:09 PM

Open in App
1 / 7

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चे यजमानपद भारताकडे आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होईल. स्पर्धेचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला तर अखेरचा सामना 19 नोव्हेंबरला असणार आहे.

2 / 7

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला तीन एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत. वेस्टइंडीज दौऱ्यानंतर आशिया कप आणि ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यांपैकी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही झाली आहे. याच बरोबर, काही खेळाडूंनी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहणे सोडायला हवे, हेही स्पष्ट झाले आहे.

3 / 7

दीपक हुड्डा - दीपक हुडाला गेल्या वर्षी भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळाली होती. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली. पण नंतर त्याची कामगिरी घसरली. 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 25 च्या सरासरीने 153 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ३ बळी घेतले. आता त्याला संघात संधीही मिळणे अवघड झाले आहे.

4 / 7

दीपक चाहर - चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला फिटनेसची समस्या आहे. उत्कृष्ट फिरकी पटू बरोबरच चांगला फलंदाज असतानाही दीपकला विश्वचषकात संधी मिळणे अवघड आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस तो बांगलादेशात अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. मात्र त्यातही तो पूर्ण षटके फेकू शकला नव्हता.

5 / 7

आवेश खान - आवेश खानकडून भारतीय संघाला बरीच आशा होती. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळाली होती. मात्र त्याला चमक दाखवता आली नाही. पाच एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावे केवळ 3 बळी आहेत. टीम बाहेर गेलेल्या आवेशसाठी विश्वचषक खेळणे जवळपास अशक्य आहे.

6 / 7

वॉशिंग्टन सुंदर - रविंद्र जडेजा फीट होण्यापूर्वी वॉशिंग्टन सुंदरला सातत्याने खेळण्याची संधी मिळत होती. मात्र तो आता संघातून बाहेर आहे. 16 एकदिवसीय सामन्यांत त्याने 16 बळी मिळविण्या बरोबरच 233 धावाही केल्या आहेत. तो खालच्या फळीतील चांगला फलंदाज असल्याबरोबरच उतृष्ट गोलंदाजही आहे. मात्र रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल संघात असताना त्याला संधी मिळणे अशक्य आहे.

7 / 7

विजय शंकर - विश्वचषक आणि विजय शंकरचे नाते काही औरच आहे. 2019 मध्ये अंबाती रायडूला बाहेर करत त्याला संघात संधी मिळाली होती. या वर्षी आयपीएलमध्ये शंकरने जबरदस्त कामगिरी केली. मधल्या फळीत तो गुजरात टायटनसाठी एक भिंद बणून उभा होता. सोशल मिडियावर विजय शंकर पुन्हा विश्वचषख खेळेल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र असे होताना दिसत नाही.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवॉशिंग्टन सुंदरदीपक चहरआवेश खान
Open in App