Join us

टीम इंडियातील या खेळाडूची होणारी पत्नी आहे बिझनेसवुमन, सौंदर्यात देते अभिनेत्रींना मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 18:07 IST

Open in App
1 / 6

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे त्याने आपल्या खेळाची छाप पाडली आहे. अनेक सामन्यात टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शार्दुल ठाकूर याच्या पर्सनल लाईफबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. शार्दुल ठाकूरने गेल्यावर्षी गर्लफ्रेंड मिताली हिच्याशी विवाह केला होता. जाणून घेऊयात त्यांच्या लव्हस्टोरी विषयी.

2 / 6

शार्दुल ठाकूरने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत एका कार्यक्रमात गर्लफ्रेंड मिताली परुळकर हिच्यासोबत साखरपुडा केला होता. या कार्यक्रमाला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह अनेकजण उपस्थित होते.

3 / 6

शार्दुल ठाकूरची होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिझनेसवुमन आहे. ती ठाण्यामध्ये ऑल द बेक्स नावाने एक स्टार्ट-अप कंपनी चालवते.

4 / 6

मिताली परुळकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे फोटो फॅन्सना खूप आवडतात.

5 / 6

मिताली परुळकरचं सौंदर्य मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारं आहे. या दोघांच्या साखरपुड्यानंतर आता शार्दुल ठाकूर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर विवाह करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

6 / 6

शार्दुल ठाकूर सध्या टीम इंडियाच्या तिन्ही संघांचा सदस्य आहे. तो त्याच्या घातक गोलंदाजीसह फलंदाजीसाठीही ओळखला जातो.

टॅग्स :शार्दुल ठाकूरपरिवारभारतीय क्रिकेट संघ
Open in App