Join us

Team India: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया खेळणार २८ वनडे, असं आहे आशिया कपसह संपूर्ण वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 11:06 IST

Open in App
1 / 10

सध्या सुरू असलेल्या बांगलादेश दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ०-२ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

2 / 10

पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या कामगिरीबाबत क्रिकेटप्रेमी चिंतीत आहेत. दरम्यान, या वर्ल्डकपर्यंत भारतीय संघ २८ एकदिवसीय सामने खेळणार आहे. या सामन्यांचं वेळापत्रक समोर आलं आहे.

3 / 10

वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत एकूण १५ एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर या दरम्यान, वनडे प्रकारात आशिया चषकही खेळला जाईल. त्याअंतर्गत १३ सामने खेळले जातील. भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

4 / 10

जानेवारी २०२३, श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर. ३ वनडे आणि ३ टी-२० सामने.

5 / 10

जानेवारी-फेब्रुवारी २०२३, न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ३ वनडे आणि ३ टी-२०.

6 / 10

फेब्रुवारी-मार्च २०२३, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ३ वनडे आणि ४ कसोटी सामने

7 / 10

जुलै-ऑगस्ट २०२३, वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी, ३ वनडे, ३ टी-२० सामने

8 / 10

सप्टेंबर २०२३, आशिया चषक. आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित होईल. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह १२ सामने खेळले जातील.

9 / 10

सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३: ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने.

10 / 10

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण ४८ सामने आयोजित होतील.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआंतरराष्ट्रीय क्रिकेटबीसीसीआय
Open in App