इंडियन प्रिमियर लीग (WPL) च्या नव्या हंगामाची सुरुवात ९ जानेवारीपासून होणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारीही सुरु आहे. पण यादरम्यान तीन परदेशी खेळाडूंनी आगामी WPL स्पर्धेतून माघार घेतली आहे.
महिला क्रिकेट जगतातील सुंदरी अर्थात ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरीसह एनाबेल सदरलंड आणि अमेरिकन तारा नॉरिस यांनी WPL च्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सहाजिकच या तिघींवीर संघासाठी 'दगाबाज' ठरल्या असा ठपका लागला आहे. इथं जाणून घेऊयात त्यांनी माघार घेण्यामागचं कारण आणि त्यांच्या जागी कुणाला लागली लॉटरी यासंदर्भातील माहिती
लेफ्ट आर्म मध्यम जलदगती गोलंदाज तारा नॉरिस ही नॅशनल ड्युटीमुळे WPL मधून आउट झाली आहे. ती यूपी वॉरियर्सचा भाग होती. तिची आयसीसी महिला पात्रता फेरीतील लढतीसाठी USA संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान नेपाळमध्ये खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरी हिने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेत खेळू शकत नाही, असे म्हटले आहे. तिने नेमकं कारण सांगितलेले नाही. तिच्या अनुपस्थितीमुळे RCB च्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
एनाबेल सदरलंड हिने देखील वैयक्तिक कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. ती दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होती.
यूपी वॉरियर्सच्या संघाने नॉरिसच्या जागी ऑस्ट्रेलियन अनकॅप्ड खेळाडू चार्ली नॉट हिला १० लाख रुपयांसह आपल्या संघात सामील करून घतेल आहे.
स्मृती मानधनाच्या RCB च्या संघाने एलिसा पेरीच्या जागी सायली सातघरे या मुंबईकर मराठमोळ्या छोरीला ३० लाख रुपयांसह आपल्या संघात सामील केले आहे.