Join us
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यकुमार यादवचा वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात धमाका! मोडला किंग कोहलीचा हा 'विराट' विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 16:15 IST

Open in App
1 / 6

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध (USA) खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने वादळी फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

2 / 6

फलंदाजीच्या वेळी भारतीय संघाची स्थिती एकेकाळी ७७ धावांत ६ बाद अशी बिकट असताना, सूर्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत टीम इंडियाला लाजिरवाण्या आणि मोठ्या संकटातून बाहेर काढले.

3 / 6

भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ २० षटकांत ८ बाद १३२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्यामुळे भारताने हा सामना २९ धावांनी जिंकला.

4 / 6

सूर्याने ४९ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. टी२० विश्वचषक इतिहासात भारतीय कर्णधाराने केलेली दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

5 / 6

कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या १०५ व्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १७ व्यांदा 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला. यासह त्याने विराट कोहलीचा (१६) विक्रम मोडीत काढला.

6 / 6

सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच' जिंकणाऱ्यांच्या यादीत सूर्यकुमार आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. तो केवळ मलेशियाचा विरदीप सिंह (२२) आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (१९) यांच्या मागे आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवरोहित शर्माविराट कोहली