Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC: टीम इंडियासाठी ठरली 'लकी चार्म', स्टेडियममधल्या फॅनची चर्चा झाली जाम; पाहा 'ती' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:37 IST

Open in App
1 / 12

भारतात सध्या टी२० विश्वचषकाची धूम सुरु आहे. भारताने नुकताच झिम्बाब्वेचा पराभव करून सेमीफायनलच्या दिशेने पाऊल टाकले.

2 / 12

या सामन्यात भारतीय संघाला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यातच एका खास तरुणीनेही हजेरी लावली.

3 / 12

भारतीय संघासाठी ही तरुणी 'लकी' ठरली. कारण दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ढेपाळलेली भारतीय फलंदाजी झिम्बाब्वेविरूद्ध चांगलीच बहरली.

4 / 12

भारतीय संघाच्या दमदार कामगिरीनंतर या तरुणीची चर्चा रंगली आहे. ही तरुणी नेमकी कोण आहे याची साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

5 / 12

ही तरुणी म्हणजे लोकप्रिय मॉडेल आणि अभिनेत्री अन्वेशी जैन. अन्वेषीने स्वत: तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

6 / 12

अन्वेशी जैन ही एक अभिनेत्री, मॉडेल, गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचा जन्म मध्य प्रदेशातील खजुराहो येथे झाला आहे.

7 / 12

'गंदी बात 2' या वेब सीरिजमधील बोल्ड भूमिकेमुळे आणि मादक अभिनयामुळे तिला तरुण चाहत्यावर्गात मोठी आणि झटपट प्रसिद्धी मिळाली.

8 / 12

'गंदी बात'मुळे एका रात्रीत अन्वेशी सोशल मीडिया सेन्सेशन बनली आणि भारतातील गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्रीही बनली होती.

9 / 12

तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आहे, पण मॉडेलिंग ही तिची आवड होती. तिने आवड जोपासत अभिनयात करिअर केले.

10 / 12

ती एक उत्तम निवेदिका आणि TEDx स्पीकर देखील आहे. तिने अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स होस्ट केले असून ती प्रसिद्ध अँकरदेखील आहे.

11 / 12

अन्वेशी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे स्वतःचे ऑफिशियल ॲपदेखील आहे. तसेच तिच्या कर्व्ही फिगरमुळे ती कायम चर्चेत असते.

12 / 12

अभिनेत्री म्हणून अन्वेशीने 'मार्टिन' (2024), 'रामा राव ऑन ड्युटी' (2022) आणि 'G the Film' (2020) या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्सोशल मीडियाभारत-झिम्बाब्वेवेबसीरिज