ऑस्ट्रेलियात झालेली टी-२० क्रिटेट वर्ल्डकप स्पर्धा कमालीची रंगतदार झाली. पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत क्रिकेटप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. दरम्यान, या स्पर्धेत सर्वाधिक षटकात ठोकण्याचा मान अनेक दिग्गजांना पछाडत एका भलत्याच अष्टपैलू क्रिकेटपटूने पटकावला आहे. तर सूर्यकुमार यादवच्या रूपात केवळ एकाच भारतीय फलंदाजाला या यादीत स्थान मिळालं आहे.
या यादीत समावेश झालेला भारताचा एकमेव फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत पाचव्या क्कमांकावर राहिला. त्याने ६ सामन्यात ९ षटकार खेचले.
ऑस्ट्रेलियाच्या मार्क स्टोयनिसने टी२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. त्याने ४ सामन्यात ९ षटकार ठोकले.
सर्वाधिक षटकार ठोकरणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा कुशल मेंडिस तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने ८ सामन्यात १० षटकार ठोकले.
सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स दुसऱ्या स्थानी राहिला. त्याने ६ सामन्यात मिळून १० षटकार खेचले. त्यातील ७ षटकार तर त्याने भारताविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ठोकले.
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनण्याचा मान झिम्बाब्वेचा अष्टपैलू क्रिकेटपटू सिकंदर रजा याने पटकावला. त्याने ८ सामन्यात मिळून ११ षटकार खेचले.