Join us

"टीम इंडियाला जर वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची असेल तर..."; सुनील गावसकरांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:56 IST

Open in App
1 / 6

Team India: भारतीय संघाला मायदेशात झालेल्या T20 World Cup 2023 मध्ये उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभूत केले.

2 / 6

ICC स्पर्धांमध्ये यावेळी भारताने नेहमी कट्टर झुंज देण्याऱ्या न्यूझीलंडचा दोन वेळा पराभव केला होता. पण असे असूनही भारताला विजेतेपदाने हुलकावणी दिली.

3 / 6

भारताला गेल्या काही वर्षांपासून विश्वचषक स्पर्धा आणि इतर ICC स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही. अशा परिस्थितीत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी एक मोठं विधान केलं.

4 / 6

'नजीकच्या भविष्यकाळात निवडकर्त्यांकडून काही अंशी महत्त्वाचे निर्णय घेतले जायला हवेत. २००७ नंतर भारताला टी२० विश्वचषक जिंकता आलेला नाही हे मोठे अपयश आहे. इतके खेळाडू IPL खेळत असूनही जर हे घडत असेल तर ही चिंतेची बाब आहे,' असे मत गावसकरांनी व्यक्त केले.

5 / 6

'खेळाबाबत निष्ठा असणे हा वेगळा मुद्दा आहे पण जर तुम्ही तुमच्या सामन्यात झालेल्या चुकांपासून काहीच शिकत नसाल तर त्याचा तुमच्या कारकिर्दीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्याने तुमच्या प्रगतीचा वेग मंदावतो.'

6 / 6

'भारतीय संघाला जर भविष्यात वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकायची असेल तर त्यांना फायनलमध्ये केलेल्या चुकांचा विचार करावा लागेल आणि त्या चुका टाळून स्वत:मध्ये सुधारणा करावी लागेल,' असा अतिशय मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघभारत