Join us

स्मृती-प्रतीका जोडीने रोहित-गिलला टाकले मागे! आता दोघींना खुणावतोय सचिन-गांगुलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 11:25 IST

Open in App
1 / 9

भारतीय महिला संघाची उप-कर्णधार स्मृती मानधना आणि सलामीची युवा बॅटर प्रतीका रावल सातत्याने दमदार कामगिरी करुन दाखवत टीम इंडियाची नंबर जोडी म्हणून नावारुपाला येत आहे.

2 / 9

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत दोघींनी शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातल्याचे पाहायला मिळाले.

3 / 9

महिला टीम इंडियाच्या रेकॉर्ड ब्रेकर जोडीनं पुरुष संघातील रोहित शर्मा आणि गिलला मागे टाकले असून आता त्यांच्या नजरा या सचिन गांगुलीच्या महारेकॉर्डवर आहेत.

4 / 9

२०२५ मध्ये या जोडीनं सातत्याने हिट शो दाखवून देताना आतापर्यंत १५५७ धावा काढल्या आहेत. कॅलेंडर ईयरमध्ये सलामीच्या रुपात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सलामी बॅटरच्या यादीत त्यांनी रोहित शर्मा आणि शुबमन गिल जोडीला मागे टाकले आहे.

5 / 9

शुबमन गिल आणि रोहित शर्मा या जोडीनं २०२३ मध्ये एकदिवसीय सामन्यात भारतीय पुरुष संघाच्या डावाची सुरुवात करताना १५२३ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

6 / 9

रोहित-गिलला मागे टाकल्यावर आता या जोडीच्या नजरा या सचिन-गांगुलीनं सेट केलेल्या महारेकॉर्डवर असतील. यासाठी त्यांना एक सामना पुरेसा ठरेल. ७९ धावाची सलामी देताच एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामी बॅटरच्या यादीत ही जोडी सचिन गांगुलीला मागे टाकत अव्वलस्थानी पोहचेल.

7 / 9

१९९८ मध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात करताना १६३५ धावा केल्या होत्या. अनेक वर्षांपासून हा वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित आहे.

8 / 9

एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामी जोडींच्या यादीत अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वा या ऑस्ट्रेलियन जोडीही टॉप ५ मध्ये आहे. १९९९ मध्ये या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना १५१८ धावा केल्या होत्या.

9 / 9

टॉप ५ मध्ये सचिन गांगुली जोडी दोन वेळा दिसते. १९९८ शिवाय २००० मध्ये या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात करताना भारताच्या डावाची सुरुवात करताना एका वर्षात दोघांनी मिळून १४८३ धावा कुटल्या होत्या.

टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघस्मृती मानधनारोहित शर्माशुभमन गिलसचिन तेंडुलकरसौरभ गांगुली