टीम इंडियाला महिला क्रिकेटमधील वनडेचा पहिला वर्ल्डकप मिळवून देणारी वाघीण म्हणजे स्टार क्रिकेटर स्मृती मानधना.
स्मृती मानधना गेल्या एक-दीड महिन्यात विविध कारणांमुळे चर्चेत आली. काही वेळा सकारात्मक तर काहीवेळा वेदनादायी.
स्मृतीचे लग्न पलाश मुच्छल (Palaash Mucchal) याच्याशी होणार होते. पण आयत्यावेळी लग्नात विघ्न आले.
ऐन लग्नाच्या दिवशीच स्मृती मानधनाचे वडील प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल झाले आणि लग्न लांबवणीवर पडले.
स्मृती आणि तिच्या कुटुंबीयांनी या कठीण काळात परिस्थिती प्रचंड धीराने हाताळली. त्यांनी कुठेही संयम सुटू दिला नाही.
काही दिवसांनी स्मृतीने लग्न मोडल्याचे सांगितले. तसेच आता ती पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले.
आयुष्यातील या कठीण प्रसंगावर मात करून स्मृती मानधना आता हळूहळू सार्वजनिक जीवनात रूळताना दिसत आहे.
नुकतीच स्मृती कार्यक्रमासाठी स्टेजवर आली. समोर मोठा जनसमुदाय होता. साऱ्यांनी तिचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
स्मृतीचे स्मितहास्य, तिची जिद्द, चिकाटी अन् लढाऊवृत्ती या साऱ्यालाच एक क्रिकेटरसिक म्हणून त्रिवार सलाम!